महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन, ३०० विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वितरण
By नितीन पंडित | Published: August 2, 2023 07:48 PM2023-08-02T19:48:18+5:302023-08-02T19:48:26+5:30
महसूल सप्ताह निमित्त भिवंडी तहसीलदार कार्यालयामार्फत शहरातली कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या जे एम मोमीन गर्ल्स महाविद्यालयात युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.
भिवंडी : महसूल सप्ताह निमित्त भिवंडी तहसीलदार कार्यालयामार्फत शहरातली कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या जे एम मोमीन गर्ल्स महाविद्यालयात युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रेवती गायकर,उपविभागीय अधिकारी अमित सानप, पालिका आयुक्त अजय वैद्य,तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे, वक्ते अतिश कुलकर्णी, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे, कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तल्हा फक्की, प्राचार्या डॉ तबस्सूम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील ३०० हून अधिक विद्यार्थिनींना तहसीलदार कार्यालयाकडून रहिवासी दाखले देण्यात आला.या सोबत ज्या मुलांचे मातापिता यांचे निधन झाले आहे अशा अल्पवयीन बालकांना अनाथ दाखला,संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थी यांना देखील दाखले वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात महसूल विभागाच्या माहिती सोबत मतदार नाव नोंदणी बाबत विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, आदेश म्हात्रे,मंडळ अधिकारी, तलाठी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पाटील यांनी केले.