संमेलनाच्या २५ लाखांवरून आयोजकांची कोंडी : महापौरांकडून चणचणीचा मुद्दा, राज्य सरकारने पैसे देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:56 AM2017-11-14T01:56:52+5:302017-11-14T01:57:02+5:30

डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून सुरू झालेल्या रूसव्याफुगव्याचे कवीत्त्व अजून संपलेले नाही. संमेलन पार पडून नऊ महिने उलटले तरी त्यासाठीचे २५ लाख पालिकेने थकवले असून

The organizers stoop to 25 lakhs of meeting: issue of molestation by the mayor | संमेलनाच्या २५ लाखांवरून आयोजकांची कोंडी : महापौरांकडून चणचणीचा मुद्दा, राज्य सरकारने पैसे देण्याची सूचना

संमेलनाच्या २५ लाखांवरून आयोजकांची कोंडी : महापौरांकडून चणचणीचा मुद्दा, राज्य सरकारने पैसे देण्याची सूचना

Next

जान्हवी मोर्ये
डोंबिवली : डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून सुरू झालेल्या रूसव्याफुगव्याचे कवीत्त्व अजून संपलेले नाही. संमेलन पार पडून नऊ महिने उलटले तरी त्यासाठीचे २५ लाख पालिकेने थकवले असून त्याची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नसल्याने खेटे घालून आयोजक हवालदिल झाले आहेत. संमेलनाला ५० लाखांचा निधी देण्याचे आश्वासन देणाºया महापौरांनी आता या निधीची जबाबदारी राज्य सरकारच्या गळ््यात घातली असून त्यांनीच संमेलनाला निधी वाढवून द्यावा, असे सुचवले आहे.
संमेलनात मानाचे पान न मिळाल्याच्या रागातूनच हा निधी अडवल्याची चर्चा उघडपणे साहित्यविश्वात सुरू झाली असून साहित्य संमेलनाला ‘बैलबाजार’ असे संबोधणाºया पक्षाकडून हा निधी मिळत नसेल, तर भाजपाच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांना शब्द टाकायला लावून पालिकेकडून हा निधी मिळवून द्यावा, असा सूर उमटत आहे.
डोंबिवलीत आगरी समाजाच्या पुढाकारातून ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्यातून या समाजाला प्रथमच अखिल भारतीय पातळीवरील बहुमान मिळाला. आगरी साहित्यसेवेची चर्चा झाली. पण महापालिकेने अजूनही २५ लाखांचा निधी अडवल्याने हा आगरी समाजाच्या कोंडीचा प्रयत्न सुरू असल्याची भावना त्या समाजातील अणि खास करून २७ गावांतील नेत्यांची बनली आहे. सध्या बडोद्यातील ९१ व्या संमेलनाचे पडघम वाजू लागले, तरी आयोजकांच्या कोंडीचे प्रयत्न सुरू असल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया डोंबिवलीच्या साहित्य वतुळात उमटते आहे. खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी देण्यास सुचवूनही त्यांच्या शब्दालाही किंमत दिली जात नसल्याने आता मुख्यमंत्र्यांकडेच हा विषय न्यावा, अशी आगरी समाजातील तरूणांची भावना आहे.
साहित्य संमेलनासाठी जेव्हा जागेची चाचपणी कल्याण आणि डोंबिवलीत सुरु झाली. तेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांसह समिती प्रथम कल्याणमध्ये गेली. तेथील स्थळपाहणीच्या वेळी संमेलन कल्याणमध्ये घ्यावे, अशी सूचना करीत महापौर देवळेकर यांनी सगळ््यात आधी महापालिकेतर्फे संमेलनाचे पालकत्व स्वीकारात ५० लाखांचा देण्याची घोषणा केली. पण समितीने सर्व स्थळे एकत्र असल्याचा निकष लावत कल्याणपेक्षा डोंबिवलीला पसंती दिली आणि आगरी यूथ फोरमला संमेलनाच्या आयोजनाचा मान दिला. त्यामुळे महापौरांचा हिरमोड झाला. पुढे स्वागताध्यक्षपद न मिळाल्याने महापौर नाराज झाले. त्यांची समजूत काडळ््यावर कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरे महापालिकेसाठी समान आहेत. डोंबिवलीत संमेलन भरले, तरी जाहीर केलेला ५० लाखांचा निधी देणार, असे महापौरांनी स्पष्ट केले आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यातील २५ लाखांचा धनादेश आयोजकांना देण्यात आला. संमेलन पार पडल्यावर देणी थकल्याने उर्वरित २५ लाखांच्या निधीसाठी आगरी युथ फोरमचा पाठपुरावा सुरू झाला. पण पालिका दाद देत नसल्याचे गेल्या आठ महिन्यांत दिसून आले.
ठाण्यातील नाट्यसंमेलनावेळी शिवसेनेने वेगवेगळ््या महापालिकांकडून निधी गोळा केला. तेव्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेने आपल्या वाटणीचा निधी दिला होता. त्यावेळीही पालिकेची आर्थिक स्थिती फारशी भक्कम नव्हती. तरीही अ. भा. नाट्य संमेलनाचा विचार करून पालिकेने हा भार सोसला. आता पालिकेतील आर्थिक चणचणीचे कारण दिले जात असले तरी ही स्थिती गेल्या सहा हिन्यातील आहे आणि संमेलन गेल्या आर्थिक वर्षात पार पडले होते. त्यामुळे मागील हिशेब चुते व्हावे, अशी आयोजकांची अपेक्षा होती. पण त्याऐवजी राजकीय हिशेब चुकते होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी आयुक्त पी. वेलारासू यांची भेट घेऊन २५ लाखांच्या निधीचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी केली. तेव्हा आयुक्तांनी ‘बघतो’ एवढेच आश्वासन दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी महापालिकेला फोन केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतरही धनादेश निघालेला नाही अशी माहिती वझे यांनी दिली.
महापौर राजेंद्र देवळेकर यांनी या निधीची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी, अशी भूमिका घेतली. पालिकेपेक्षा राज्य सरकार मोठे आहे, अशी मखलाशीही त्यांनी केली. पालिकेला यंदाच्या वर्षी ३०० कोटीची आर्थिक तूट असल्याने कोणतीही नवी कामे घेतली जात नाही. त्याचा फटका विकासकामांना बसला आहे. कामगारांना बोनस देता आलेला नाही. नगरसेवकांना निधी मिळालेला नाही. महापालिकेने साहित्य संमेलनाला ५० लाख देण्याचे जाहीर केले होते. आर्थिक कोंडीमुळे उरलेले २५ लाख देता आलेले नाहीत. महापालिकेपेक्षा राज्य सरकार मोठे आहे. त्यांनी संमेलनाच्या २५ लाखांच्या अनुदानात वाढ करावी. तसे झाले तर उरलेले २५ लाख देण्याची वेळच आमच्यावर येणार नाही, अशी सूचना महापौरांनी केली.
कल्याण विरूद्ध डोंबिवलीचा वाद
पालिकेतील सत्तेवर कल्याणचा वरचष्मा आहे. त्यातही कल्याणमध्ये संमलन व्हावे, अशी महापौरांची इच्छा होती. नंतर स्वागताध्यक्षपदाचा मान त्यांना मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यांच्या वतीने शिवसेनेच्या नगरसेवकांनी ती भूमिका तर मांडलीच, शिवाय संमेलनाला निधी देऊ नका अशी भूमिकाही जाहीरपणे घेतली. त्यामुळे साहित्य वर्तुळातील नाराजी भोवणार हे लक्षात आल्यावर शिवसेना फक्त कल्याणमध्ये नाही. डोंबिवलीतही आहे. सत्तेत फक्त कल्याणचे नगरसेवक नाहीत, तर डोंबिवलीतीलही आहेत, असे सुचवण्यापर्यंत वेळ गेली. साहित्य संमेलनाचा विचार करून आयोजकांनीही नंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौरांना योग्य तो मान दिला. त्यानंतरही निधी मिळत नसल्याने ही कोंडी आगरी युथ फोरमची आहे की त्यांच्या २७ गावांतील नेत्यांची आहे, याची चर्चा सुरू आहे.
२४ लाखांची देणी थकली
आयोजकांनी बहुतांश खर्च भागवले आहेत. पालिकेकडून २५ लाखांचा निधी थकल्याने २४ लाखांची देणी थकली आहेत. ते देणेकरी आगरी युथ फोरमकडे खेटे घालत आहेत. ही आर्थिक कोंडी फुटत नाही, तोवर म्हणजे पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत हा निधी मिळण्याची शक्यता नसल्याने साहित्य संमेलनासाठी काम केलेल्यांचे पैसे थकले आहेत.

Web Title: The organizers stoop to 25 lakhs of meeting: issue of molestation by the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.