दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:45 AM2021-09-21T04:45:08+5:302021-09-21T04:45:08+5:30
------------------------------- पादचारी जखमी कल्याण: खडकपाडा येथे राहणारे भालानाथ त्रिपाठी हे रस्त्यावरून पायी चालत जात होते. त्या वेळी बिर्ला ...
-------------------------------
पादचारी जखमी
कल्याण: खडकपाडा येथे राहणारे भालानाथ त्रिपाठी हे रस्त्यावरून पायी चालत जात होते. त्या वेळी बिर्ला कॉलेज रोडवर त्यांना एका भरधाव दुचाकीची ठोकर बसल्याने ते जखमी झाले आहेत. ही घटना १६ सप्टेंबरला रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------
रिक्षाची चोरी
कल्याण : पूर्वेकडील आडीवली-ढोकळी परिसरात राहणारे मल्लाया दुप्पाली यांची त्यांची मित्राने रिक्षा महालक्ष्मी शॉपिंग सेंटर, शिवसेना शाखेसमोर पार्क केली होती. तेथून ती रिक्षा चोरीला गेल्याची घटना ११ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------------------
दुचाकीचोरी
कल्याण : नितीन मोरजे यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या खडकपाडा परिसरातील गुरुमाऊली सोसायटीच्या आवारात पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------------
शोकसभेचे आयोजन
कल्याण: केडीएमसीचे माजी नगरसेवक प्रकाश पेणकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची सर्वपक्षीय शोकसभा मोरया हॉल येथे गुरुवारी आयोजिली आहे. तत्पूर्वी बुधवारी परिवहन उपक्रमातील मान्यताप्राप्त युनियनच्या वतीनेही दुपारी एक वाजता त्यांच्या शोकसभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांनी दिली.
----------------------------------
घनकचरा गाड्या नादुरुस्त
डोंबिवली: केडीएमसीच्या घनकचरा विभागाकडून कचऱ्याच्या नादुरुस्त गाड्या चालविल्या जात असल्याने वाहतूककोंडीचा फटका अन्य वाहनचालकांना बसत आहे. ४ सप्टेंबरला मंजुनाथ शाळेजवळ गाडी बंद पडल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिवारीदेखील खंबाळपाडा रोडवरील विकासनाका परिसरात टायर पंक्चर झाल्याची घटना घडली. नादुरुस्त गाड्या कचरा संकलनासाठी बाहेर काढल्या जात असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----