"इतर पक्षांनी समाजाचे देणे लागतो या बांधिलकीतून समाजहिताचे काम करावे"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 05:25 PM2020-09-29T17:25:53+5:302020-09-29T17:26:08+5:30
उल्हासनगर महापालिकेला शिवसेनेकडून ९ रुग्णवाहिका
उल्हासनगर : ऐन कोरोना महामारीत रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या वतीने ८ रुग्णवाहिका व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून १ कार्डिअल रुग्णवाहिका उल्हासनगर महानगरपालिकेस शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते देण्यात आली. व्ही टी सी मैदानात मंगळवारी दुपारी १ वाजता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. इतर पक्षांनी समाजाचे देणे लागतो. या बांधिलकीतून समाजहिताचे काम करावे अशी अप्रत्यक्ष टीका लांडगे यांनी भाजपासह इतर पक्षावर केली.
उल्हासनगरात मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सामान्य नागरिकांना रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले होते. तसेच रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा बिले आकारात असल्याने नागरिकात असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर महापालिकेने रुग्णवाहिकासह शालेय बसेस कोरोना रुग्णाला आणण्यासाठी भड्यातत्वार नेमल्या. रुग्णवाहिका मिळत नसल्याने रूग्णालयात जाण्या पूर्वीच रुग्ण मृत्यू होत असल्याचे प्रकार उघड झाले होते. अश्या परिस्थितीत शिवसेना महापालिकेच्या मदतीला धावली. कोरोना रुग्णासाठी ८ रुग्णवाहिका व खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने कार्डीअल रुग्णवाहिका महापालिकेला देण्यात आली. मात्र गेल्या एका महिन्या पासून रुग्णवाहिका महापालिका प्रभाग समिती कार्यालय प्रांगणात पडून होत्या.
महापालिका प्रभाग समिती क्रं-३ येथील व्हि टी सी ग्राउंड मध्ये मंगळवारी दुपारी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून रुग्णवाहिकेची चाबी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिली. यावेळी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह महापालिका परिवहन विभागाचे प्रमुख यशवंत सगळे आदी जन उपस्थित होते.