लोकमतच्या रक्तदानाच्या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा : समीर चौगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:33+5:302021-07-26T04:36:33+5:30
ठाणे : लोकमत वृत्तपत्र समूहाने स्व. जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर राबविले. रक्तदान ...
ठाणे : लोकमत वृत्तपत्र समूहाने स्व. जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर राबविले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले.
लोकमत, ठाणे शहर काँग्रेस आणि श्री अय्यपा भक्त सेवा संघम, वर्तकनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अय्यपा भक्त सेवा संघमच्या सभागृहात रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन अभिनेते समीर चौगुले यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले की, कोरोना काळात राज्यात अवघ्या पाच हजार रक्ताच्या बाटल्या शिल्लक होत्या. लोकमतने हा उपक्रम हाती घेतल्यानंतर ६० हजार रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्या. ही निश्चितच चांगली बाब आहे. इतका उदंड प्रतिसाद लाभेल, असे आमच्यासारख्या कलाकारांनाही वाटले नव्हते. समाज सजग असल्याचे हे चांगले उदाहरण आहे. लोकमत राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे लोकमतशी आपले नाते आहे. आता ६० हजार बाटल्या संकलित झाले असले तरी अजूनही नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे चौगुले म्हणाले.
यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक विक्रांत चव्हाण, महासचिव सचिन शिंदे, संजय दंडाळे, रवींद्र आंग्रे, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष हेमंत पाटील, सुखदेव घोलप, रवी कोळी, संदीप शिंदे, रेखा मिरजकर आणि वर्तकनगर ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे तसेच श्री अय्यपा भक्त सेवा संघमचे अध्यक्ष शशीधरण नायर, महासचिव बाबू कुटी, सुशिद्रन मेनन आणि चंद्रमोहन पिल्ले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
¯¯¯¯जोड आहे.