अन्यथा सोमवार पासून हॉटेल आणि पार्सल सेवा बेमुदत बंद; हॉटेल व्यावसायिकांचा राज्य सरकाराला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:26 PM2021-08-04T18:26:45+5:302021-08-04T18:27:23+5:30
ठाण्यासह जिल्ह्यात र्निबध शिथील झाले असले तरी देखील हॉटेल व्यावसायिकांना यात सुट देण्यात आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात र्निबध शिथील झाले असले तरी देखील हॉटेल व्यावसायिकांना यात सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यावासायिकांना बुधवारी या विरोधात शांततेच्या मार्गाने आपआपल्या हॉटेलमध्ये आंदोलन केले. परंतु यावेळी जर रविवार र्पयत हॉटेल आणि रेस्टॉरेन्टची वेळ वाढवून दिली नाही तर सोमवार पासून सर्व हॉटेल बेमुदत बंद केली जातील तसेच पार्सल सेवाही बंद करु असा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी दिला.
राज्य शासनाने राज्यातील ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात कोरोना र्निबध शिथील केले आहेत. त्याची अंमलबजावणी ठाणो जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झाली आहे. परंतु हे र्निबध शिथील करीत असतांना मॉल,मल्टीप्लेक्स आणि हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय करण्यात आला आहे. दुकानांसाठी रात्री १० वाजेर्पयतची वेळ देण्यात आली आहे. परंतु हॉटेल व्यावसायिकांसाठी चार वाजेर्पयतचीच वेळ निश्चित करण्यात आली असून ५० टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील तब्बल ७१५ हॉटेल चालकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बुधवारी या निर्णयाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.
ठाणे महापालिकेने देखील आद्यादेश काढून काय सुरु राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सांयकाळी चार वाजेर्पयत 5क् टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच रविवारी हॉटेल पूर्णपणो बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. पुन्हा र्निबध कठोर करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोटय़ा मोठय़ा हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरुन कामासाठी आणण्यात आले आहेत.
र्निबध शिथील होत असल्याने त्याचा फायदा आम्हालाही होईल या आशाने गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बील, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसियांकाचे म्हणने आहे. इतर व्यवसायांना सवलत देण्यात आली आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांचे धंदाच दुपार नंतर सुरु होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपार नंतर रात्री १० र्पयत हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. किंवा सांयकाळी ६ ते रात्री १२ वाजेर्पयत परवानगी द्यावी अशी मागणीही केली आहे. त्यामुळे रविवार र्पयत आम्ही वाट बघणार आहोत, परंतु तो र्पयत निर्णय आला नाही तर सोमवार पासून हॉटेल पूर्णपणो बेमुदत बंद ठेवली जातील, तसेच पार्सलची सेवाही बंद असेल असा इशाराही हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे.