...अन्यथा प्रजासत्ताकदिनी रजा आंदोलन अटळ : मागण्यांसाठी अग्निशमन कर्मचारी पुन्हा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:28 AM2017-12-18T01:28:36+5:302017-12-18T01:28:54+5:30
केडीएमसीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १ ते १५ जून या कालावधीत काळीफीत आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर, २६ जूनला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामावर हजर न होता सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, अजूनही त्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कल्याण : केडीएमसीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १ ते १५ जून या कालावधीत काळीफीत आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर, २६ जूनला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामावर हजर न होता सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, अजूनही त्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
अग्निशमन विभागात नवीन भरती, जादा कामाचा मोबदला, सुटीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला अशा अग्निशमन कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय कामगार सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाºयांनी काळीफीत आंदोलन छेडले होते. याची दखल न घेतल्यास सार्वजनिक सुटीच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, काळीफीत आंदोलनाची दखल न घेतल्याने ९० कर्मचाºयांनी सामूहिक रजेचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाला सादर केले. परंतु, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या मध्यस्थीने प्रशासन आणि संघटनेच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. या वेळी महासभेत यासंदर्भातील अहवाल सादर करून महिनाभरात मागण्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ठोस कृती केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. यात कर्मचाºयांना मिळणारा विशेष वेतन जोखीमभत्ता फायरमन यांना ३८० रु. आणि लिडिंग फायरमन ते अधिकाºयांना दरमहा ४०० रुपये मिळेल, असे सांगितले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले होते.
प्रजासत्ताकदिनी केवळ परेडमध्येच सहभाग
उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना १५ आॅगस्टला दिलेले पुरस्कार वगळता उर्वरित एकही मागणी आजवर पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संघटना आक्रमक झाली आहे. महासभेत देखील या मागण्यांना बगल देण्यात आली. जानेवारी महिन्याच्या महासभेत जर उचित कार्यवाही झाली नाही, तर आंदोलन अटळ असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. केवळ पुरस्कार देऊन बोळवण केली असली, तरी आता माघार नाही. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. या वेळी कर्मचारी परेडमध्ये सहभागी होतील. पण, त्यानंतर एकही कॉल स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती संघटनेचे कल्याण युनिटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी दिली.