अमली पदार्थांच्या विळख्यातून ११६ रुग्ण बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:40 AM2018-10-02T04:40:14+5:302018-10-02T04:40:59+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय : समुपदेशनाच्या माध्यमातून उपचार
ठाणे : मादक पदार्थांच्या सेवनाच्या आहारी जाऊन मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ११६ रुग्णांचे ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या वतीने मागील पाच महिन्यांत समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. याखेरीज, १६ जण आजही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती ‘जागतिक नो अल्कोहोलिक डे’च्या पार्श्वभूमीवर दिली आहे.
वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार दरवर्षी २५ दशलक्ष अल्कोहोलबाधित मृत्यू होत आहेत. त्यापैकी तीन लाख २० हजार जण हे १५ ते २९ या वयोगटांतील आहेत. त्यातही काहीजण हे व्यसनाच्या अधीन गेल्याचे दिसून आले आहे. अशा व्यसनामुळे मानसिक आजार जडलेल्या लोकांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या वतीने समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त करण्यात येते. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आंतर व बाह्यरु ग्ण विभाग मिळून ३१४ रु ग्णांवर उपचार सुरू होते. यामध्ये बाह्यरु ग्ण विभागात २०८ जुने रु ग्ण आजही उपचारासाठी येत आहेत. तर, ५९ नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ४७ रु ग्ण औषधोपचारासाठी रु ग्णालयात दाखल आहेत.
एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या पाच महिन्यांच्या कालावधीत आंतररु ग्ण व बाह्यरु ग्ण विभाग मिळून १३२ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. बाह्यरु ग्ण विभागात ११६ जुने रु ग्ण आजही रु ग्णालयात उपचारासाठी येत आहेत. यामध्ये २४ नवीन रु ग्णांची भर पडली, तर ९२ जुने रु ग्ण औषधोपचारासाठी रु ग्णालयात येत आहेत. त्यात सध्याच्या घडीला जिल्हा रु ग्णालयात १६ रु ग्ण उपचारार्थ दाखल असल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.
रूग्णांवर औषधोपचार
व्यसनाच्या आहारी जाऊन मानसिक आजार जडलेल्या रुग्णांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. दीक्षा रोहिला, मनोविकृती समाजसेवक श्रीरंग सिद, जिनी पटणी हे समुपदेशन करून योग्य औषधोपचारही करत आहेत.