प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १६०३ रुग्णांपैकी अवघ्या ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 03:13 PM2022-06-16T15:13:22+5:302022-06-16T15:13:32+5:30

कोरोनाची चौथी लाट उंबरठय़ावर असतांना मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णात वाढ होतांना दिसत आहे.

Out of 1603 patients receiving direct treatment, only 95 patients were treated in the hospital | प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १६०३ रुग्णांपैकी अवघ्या ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १६०३ रुग्णांपैकी अवघ्या ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: कोरोनाच्या नव्या बी ए ५ व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण ठाण्यात आढळला आहे. मात्र तो रुग्ण बरा होऊन आता इतर ठिकाणी देखील गेला आहे. दरम्यान वाढत्या कोरोनामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली असली तरी देखील यामध्ये रुग्ण तीन ते चार दिवसात बरा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार सध्याच्या घडीला एकूण प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या १६०३ रुग्णांपैकी  अवघे ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील १४ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल असून ते इतर व्याधीग्रस्त असल्याने त्यांच्यावर तेथे उपचार सुरु असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

कोरोनाची चौथी लाट उंबरठय़ावर असतांना मागील काही दिवसापासून ठाण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णात वाढ होतांना दिसत आहे. रोजच्या रोज २०० हून अधिक नवे रुग्ण ठाण्यात आढळत आहेत. महापालिका हद्दीत आतार्पयत १ लाख ८६ हजार ५७५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील १ लाख ८२ हजार ८४१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतार्पयत २ हजार १३१ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सध्या १ हजार ६०३ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरु असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

यातील ९५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील ४१ रुग्ण हे पार्कीग प्लाझा, ३३ रुग्ण हे हायरिस्क कॉन्टेक्ट मधील असल्याने त्यांना भाईंदरपाडा येथे ठेवण्यात आले आहे. २१ रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ७४ रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये, २ रुग्णांना ऑक्सीजन बेड आणि १४ जणांवर आयसीयुमध्ये उपचार सुरु असून ते इतर व्याधीग्रस्त आहेत. तसेच त्यांचे वय हे ६० वर्षापेक्षा अधिक असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान उर्वरीत १५०८ रुग्णांवर घरीच उपचार सुरु असल्याचेही पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

कोरोना चाचण्या वाढल्या 

महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी दिवसाला १५० ते २०० कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. परंतु आता त्याचे प्रमाण वाढविण्यात आले असून शहरातील पाच ठिकाणी आरटीपीसीआरची चाचणीही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी १२९९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 हर घर दस्तक मोहीम २ मध्ये ७६०० नागरीकांचे लसीकरण 

महापालिकेच्या माध्यमातून हर घर दस्तक २ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार २ जून पासून ते आतार्पयत या मोहीमे अंतर्गत ७६०० नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर पहिला आणि दुसरा डोस धरुन ३४ लाखापैंकी ३१ लाख ५ हजार ७८० जणांनी लस घेतली आहे. त्यात पहिला डोस घेणा:यांचे प्रमाण हे ९९.३९ टक्के एवढे आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ८८ टक्के आहे. दुसरीकडे कोरोना वाढत असल्याने बुस्टर डोस घेण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात असले तरी देखील आतार्पयत केवळ ७५ हजार नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

Web Title: Out of 1603 patients receiving direct treatment, only 95 patients were treated in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.