मोखाड्यामध्ये नागली, भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:27 AM2020-09-30T00:27:22+5:302020-09-30T00:27:39+5:30
शेतकरी धास्तावले : हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती, मुसळधार पावसाचा परिणाम
जव्हार : मोखाडा तालुक्यात खरिपात भात, नागली आणि वरई ही मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. सततच्या मुसळधार पावसामुळे भातावर बगळ्या तर नागली पिकावर बेडक्या आणि खैºया रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातच हे पीक आडवे होऊ न ते कुजू लागले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असून धान्याऐवजी हाती पेंढाच येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मोखाड्यात खरिपाच्या एकूण १३ हजार हेक्टर शेतीच्या चार हजार ५०० हेक्टर नागली, तर भाताचे दोन हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. येथील आदिवासी शेतकऱ्यांना एकमेव खरीप पिकाचाच उदरनिर्वाहासाठी आधार आहे. अन्य कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पोटरीत आलेल्या ( लोंब येण्याची वेळ ) पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
मुख्य नगदी पीक असलेल्या नागलीवर बेडक्या आणि खैºया तर भातपिकावर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभे पीक आडवे होऊन जमीनदोस्त होऊ लागले आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. यापुढे सतत कोसळधार सुरू राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊन शेतकºयांच्या हाती गवताचा पेंढा येणार आहे.
नागली व भाताचे पीक चांगले बहरले होते. मात्र, सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने या पिकांवर बगळ्या, बेडक्या आणि खैºया हा रोग पडला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी ही पिकांची पाहणी केली आहे. त्यामुळे या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी.
- दिलीप जागळे,
शेतकरी व माजी सरपंच, गोमघर-डोंगरवाडी