डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 08:47 AM2020-09-10T08:47:13+5:302020-09-10T09:01:17+5:30

ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली.

Outburst of passengers in queue at Dombivali, ST bus stopped | डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

Next
ठळक मुद्देमंत्रालय गाड्या अधिक सोडत असल्याने नाराजीठाणेसाठी बसेस सोडण्याची मागणीसातत्याने बसची मागणी होत असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर

- अनिकेत घमंडी
डोंबिवली - अत्यावश्यक सेवेसाठी सरकारी कामगारांना रेल्वे सुविधा आहे, परंतु खासगी कंपन्यांच्या ठिकाणी मात्र कामावर जाणाऱ्यांना बस मार्गे कामावर जावे लागत असून त्या रांगेत आम्ही तासनतास उभे असतो, आम्हाला बस सुविधा वेळेत आणि त्यांची उपलब्धता वाढवा अशी मागणी करत प्रवाशांनी गुरुवारी सकाळी उद्रेक केला. युवक, युवतींनी बस रोखून संताप व्यक्त केला.

ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. त्यांनी आधी ठाणे बस सोडा अशी मागणी करत न्याय मागितला, सातत्याने बसची मागणी होत असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांचा संताप अनावर होऊन त्यांनी आधी ठाणे बस सोडा, त्याशिवाय। कोणतीही बस मार्गस्थ होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. युवक, युवती आणि पुरुषांचा त्यात समावेश होता. 

15 मिनिट हा तणाव सुरू होता, त्यानंतर आग्रहास्तव राज्य परिवहन मंडळाने एक बस ठाणे मार्गावर सोडली. ती सोडल्याची घोषणा होताच ठाण्याच्या प्रवाशांनी त्यात प्रवेश घेण्यासाठी एकच गर्दी केली, तेथे फिजिकल।डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.

यासंदर्भात एसटी मंडळाच्या नियंत्रण व्यवस्थापनाने सांगितले।की, मंत्रालय मार्गावर बस सोडण्यात आल्या असे प्रवाशांचे म्हणणे चुकीचे आहे. ज्या मंत्रालय साठी सोडतात त्या आम्हाला वरिष्ठ सूचनेनुसार सोडव्याच लागतात,  ठाणे डेपोसाठी आलेल्या बस ठाण्याला सोडायच्या त्या आम्ही सोडतो. गुरुवारी काही बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने समस्या निर्माण झाली होती, प्रवाशांनी संयम राखावा आणि कोरोना धर्तीवरील नियमांचे पालन करावे असेही आवाहन त्यांनी केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

Web Title: Outburst of passengers in queue at Dombivali, ST bus stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.