ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘उत्कृष्ठ सहकारी बँक’ पुरस्कार
By सुरेश लोखंडे | Published: October 13, 2023 04:30 PM2023-10-13T16:30:54+5:302023-10-13T16:32:15+5:30
गाेव्याचे सहकार व पाणी पुरवठा मंत्री सुभाष शिराेडकर यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण गाेंधळी यांना गोवा येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.
ठाणे : सहकारी क्षेत्रातील राज्याच्या सर्व जिल्हा बॅंकांमध्ये आघाडीवर असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवतीर् सहकारी बॅंकेला सहकार क्षेत्रातील महत्वाचा ‘उत्कृष्ठ सहकारी बँक’ पुरस्कार देउन सन्मानीत करण्यात आले आहे. गाेव्याचे सहकार व पाणी पुरवठा मंत्री सुभाष शिराेडकर यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण गाेंधळी यांना गोवा येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.
‘उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार २०२३’ या सहकारातील महत्वाच्या पुरस्कारासाठी बॅंकींग फ्रंटीअरच्या एनसीबीसी व एफसीबीए या संस्थेकडून निवड करण्यात आली आहे. बॅंकेचा आजवरचे कामकाज, त्यातील सुसूत्रता, खातेदारांना मिळणाऱ्या साेयी सुविधा, बॅंकेचा विस्तार, व्यवहार, नफा आदीं निकष विचारात घेउन या ठाणे जिल्हा मध्यवतीर् सहकारी बॅंकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. या पुरस्कार सन्मानामुळे सहकार क्षेत्रात बॅंकेचे काैतूक केले जात आहे.