100 कोटीहुन अधिक किमतीची जागा हडपण्याचा डाव उधळला; 55 एकर सरकारी जागा हडपणा-या बिल्डरावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 06:36 PM2017-12-30T18:36:08+5:302017-12-30T18:36:32+5:30
बदलापूरपासुन काही अंतरावर असलेल्या राहटोळी गावाच्या हद्दीत बदलापूरातील एका बांधकाम व्यवसायीकांने तब्बल 55 एकर सरकारी जागेवर कब्जा केला होता.
बदलापूर : बदलापूरपासुन काही अंतरावर असलेल्या राहटोळी गावाच्या हद्दीत बदलापूरातील एका बांधकाम व्यवसायीकांने तब्बल 55 एकर सरकारी जागेवर कब्जा केला होता. या जागेचे मुल्य हे 100 कोटींच्या वर आहे. सरकारी जागा हडप करुन आर्थिक लाभ मिळविणा-या बांधकाम व्यवसायीकावर कारवाई करण्यात आलेली आहे. या जागेवरील सर्व अतिक्रमण काढुन महसुल विभागाने ही जागा शासनाच्या ताब्यात घेतली आहे. बांधकाम व्यवसायिकाचा मोठा डाव उपविभागीय कार्यालय आणि तहसिलदार कार्यालयाने उधळून लावला आहे.
सरकारी यंत्रणोची फसवणूक करुन अनेक बांधकाम व्यवसायीक हे इमारतीच्या बांधकामात मोठा फायदा मिळवित आहेत. या सोबत आता बदलापूरातील प्रतिष्ठीत बांधकाम व्यवसायीकांनी ग्रामिण भागातील जागांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. बदलापूरच्या जगवळच असलेल्या जागांची विक्री करुन पालिका हद्द वाढ झाल्यावर त्या जागांचा विकास करण्याचा प्रय} हे बांधकाम व्यवसायीक करित आहेत. भविष्यातील पालिकेची हद्दवाढ लक्षात घेता अनेक बांधकाम व्यवसायीकांनी पालिकेला लागुन असलेल्या ग्रामिण भागात जागांची खरेदी केली आहे. तशाच एका बांधकाम व्यवसायीकांपैकी मनोहर म्हसकर या बांधकाम व्यवसायीकाने देखील राहटोली येथे पाच एकर जागा विकत घेतली होती. मात्र सरकार यंत्रणोंला अंधारात ठेवत आणि स्थानिक ग्रामस्थांना आर्थिक प्रलोभन देत या बांधकाम व्यवसायिकाने राहटोली गावाला लागुनच असलेल्या 55 एकर जागेवर स्वत:चा दाबा तयार केला. ही जागा विकत घेतल्याचा भास निर्माण करित त्या जागेवर बेकायदेशिर कामे देखील केली. सरकारी जागा असतांना देखील त्या जागेवर म्हसकर यांनी 3क् हजार सागाची झाले लावत त्याचा लाभ घेण्याचा प्रय} केला. येवढेच नव्हे तर या जागेवर 4 हजार 500 आंब्यांची झाडे, 1 हजार 100 नारळाची झाडे लावली आहेत. त्यात एक शेततळे देखील तयार करण्यात आले आहे. सर्व 55 एकर जागेला तारेचे कुंपण घालुन ती जागा हडप केली होती. या प्रकरणाची माहिती उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांना मिळताच त्यांनी ही सरकारी जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली होती. तसेच या जागेवरील अतिक्रमण काढुन त्या ठिकाणची सर्व सरकारी जागा संरक्षित करुन ती पुन्हा सरकारी यंत्रणोच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. गिरासे यांच्या या आदेशानंतर तहसिलदार कार्यालयाने देखील कारवाई करित गट विकास अधिकारी आणि स्थानिक राहटोळी ग्रामपंचायत यांच्या सोबत संयुक्त कारवाई केली. शनिवारी ही कारवाई सकाळी सुरु झाली. कारवाईच्या वेळी पथकाला या ठिकाणी जागेला घालण्यात आलेले संरक्षण कुंपण निदर्शनास आले. जागेचे मोजमाप केल्यावर ही जागा 55 एकरपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. तसेच या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवत करुन त्यातुन आर्थिक लाभ घेण्याचा आणि ताबा निश्चित करण्याचा प्रय} म्हसकर यांनी केल्याचे समोर आले. दोन जेसीबी आणि दोन डंपरच्या सहाय्याने संपूर्ण संरक्षक भिंत तोडण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्याच्या कारवाईत संरक्षक भिंत तोडण्यात आलेली असली तरी पुढे या जागेची मोजणी करुन सरकारी जागा निश्चित करुन ती जागा निश्चित केली जाणार आहे. तसेच त्या जागेचा ताबा ग्रामपंचायतीकडे दिली जाणार आहे.
कारवाई दरम्यान या भागात मोठय़ा प्रमाणात सागाची लागवड करण्यात आल्याचे दिसुन आले. तसेच आंब्यांची मोठी बागही असल्याने त्याचा सर्व लाभ बांधकाम व्यवसायीक घेत होते. येवढेच नव्हे तर त्या जागेमध्ये म्हशीचा मोठा तबेलाही होता. त्यातुन देखील मोठे उत्पन्न घेतले जात होते. एकंदरीत सरकारी जागा हडपुन आर्थिक लाभ मिळविणा-या म्हसकर यांना शासनाने चांगलीच चपराक लगावली आहे. ही कारवाई झालेली असली तरी सरकारी जागा हडपण्याचा प्रय} करणा-या या बांधकाम व्यवसायीकावर अद्याप पुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कारवाईचा पंचनामा झाल्यावर त्या संदर्भात देखील कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेतक-यांच्या जागा हडपणा-यांची टोळी
बदलापूरात जागेचे भाव चांगलेच वदारलेले असल्याने आता अनेक बांधकाम व्यवसायीकांनी सरकारी जागेसोबत शेतक-यांच्या वादग्रस्त जागा कमी किमतीत विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. शेतक-यांना विश्वासात न घेता मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन या जागांची खरेदी विक्री केली जात आहे. अनेक शेतकरी बिल्डरांच्या त्रसाला कंटाळले आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यात पोलीस देखील धनाडय़ांच्या बाजुनेच भूमीका घेत असल्याने बदलापूरातील शेतकरी हतबल झाले आहेत.