भर पावसात अग्निशमन दलाने वाचविले १०३ जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:05 AM2017-08-31T06:05:54+5:302017-08-31T06:05:59+5:30

मंगळवारी ठाणेकरांना मुसळधार पावसाने गाठल्यानंतर घरी आणि रस्त्यावर अडकलेल्यांची एकच धावपळ उडाली.

Over 300 people have been rescued alive by the fire brigade | भर पावसात अग्निशमन दलाने वाचविले १०३ जणांचे प्राण

भर पावसात अग्निशमन दलाने वाचविले १०३ जणांचे प्राण

Next

ठाणे : मंगळवारी ठाणेकरांना मुसळधार पावसाने गाठल्यानंतर घरी आणि रस्त्यावर अडकलेल्यांची एकच धावपळ उडाली. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे जीव मुठीत घेऊन अडकलेल्या १०३ रहिवाशांची अग्निशमन दलाच्या वेगवेगळ्या केंद्रावरील जवानांनी प्राणांची बाजी लावून सुटका केली. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांची त्यांना मोलाची मदत मिळाली.
दुपारनंतर पावसाचा जोर वाढला त्याच वेळी भरतीची असल्याने खाडीतही पाणी जायला जागा नव्हती. त्यामुळे नाले, गटारे तुडूंब भरुन वाहू लागली होते. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेसह जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणांचीही एकच धावपळ उडाली. वर्तकनगर, भीमनगर, विनायक सोसायटी शिवाईनगर गार्डन बिल्डिंग, वर्तकनगर पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५३ आणि कोपरीतील शामनगर तसेच नौपाड्यातील चिखलवाडी अशा इमारतींच्या परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. याशिवाय, वागळे इस्टेट टीसा हाऊस, ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधीनगर, कैलासनगर, सिद्धेश्वर तलाव, श्रीनगर या भागांसह ८३ ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या. तर जिल्हा रुग्णालयाजवळ एक बस पाण्यात अडकल्यामुळे २० प्रवासी जीव मुठीत घेऊन बसले होते. त्यांची कौशल्याने अग्निशमन दलाने सुटका केली. याशिवाय, मनोरमानगर येथे दोन, कोपरी परिसरातून २६, बाळकूम भागातील मानपाडा आणि मनोरमानगर भागातील ३० ते ३५ आणि नौपाड्याच्या चिखलवाडीतील ३० अशा सुमारे १०३ जणांची सुटका ठाणे महापालिकेच्या जवाहरबाग, कोपरी, वागळे इस्टेट, बाळकूम, पाचपाखाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. गेली २४ तास हा विभाग जीवाची पर्वा न करता नाले आणि इमारतींमधील पाण्यात शिरुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होता. आणखीही तीन ते चार जणांचा शोध लागलेला नसून त्यांचाही शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी अरुण राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. नितिन कंपनी येथे कोरम मॉलजवळ दीपाली बनसोडे ही महिला पडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अग्शिमन दल किंवा पोलिसांना तातडीने कळविले नाही. तिच्या पतीने दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अन्यथा, तिचाही लवकर शोध लागू शकला असता, असेही ते म्हणाले.

याठिकाणी भिंत कोसळली...

पावसामुळे श्रीनगर सेक्टर चार प्रेरणा बिल्डिंगच्या कंपाउंडची भिंत, लोकमान्यनगरपाडा क्रमांक एक महिला बचत गट, देवदयानगर, आयप्पा मंदीर आदी सात ते आठ ठिकाणी भिंत कोसळल्याचे प्रकार घडले.
ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधीनगर, सिद्धेश्वर तलाव परिसरासह ३० ते ३५ ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. तर मुंब्रा येथील रेहमानिया हॉस्पिटल समोरील रोडवर दरड कोसळल्याची घटना घडली. या सर्व ठिकाणी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी धाव घेऊन मदत कार्य केले.

Read in English

Web Title: Over 300 people have been rescued alive by the fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.