मुरबाडच्या गावांची टंचाईवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:30 AM2019-05-28T00:30:41+5:302019-05-28T00:30:49+5:30

उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते.

Over the scarcity of Murbad's villages | मुरबाडच्या गावांची टंचाईवर मात

मुरबाडच्या गावांची टंचाईवर मात

Next

ठाणे/मुरबाड : उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते. सध्या मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना सोनगाव, सोनवळे भागांतील ओढे, नाले आणि विहिरींना मुबलक पाणी आहे. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातील रोटरी समूहाने गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर काँक्रि टचा बंधारा बांधला आणि गावांचे भाग्यच बदलले. या बंधाºयामुळे एरव्ही फेब्रुवारी-मार्चमध्ये आटणाºया गावाबाहेरील ओढ्यात आता मे महिन्याच्या अखेरीसही ओसंडून वाहण्याइतका पाणीसाठा आहे. वाहते पाणी अडल्यामुळे भूजलसाठा वाढून गावातील विहिरीत बारमाही पाणी टिकू लागल्यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण बंद झाली.
पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला, तरी फेब्रुवारी महिन्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. कारण, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले फेब्रुवारीपर्यंत आटतात. ठिकठिकाणी काँक्रिटचे बंधारे बांधून ते पाणी अडवले तर जवळच्या वस्तीला त्याचा उपयोग होऊ शकतो, हे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून आले आहे. रोटरीच्या वतीने ठाणे-पालघर जिल्ह्यात ४०० अधिक काँक्रि टचे बंधारे बांधले. त्यापैकी ५४ बंधारे मुरबाड तालुक्यात असल्याची माहिती जलतज्ज्ञ हेमंत जगताप यांनी दिली. ग्रामीण भागात सुलभपणे पाणी उपलब्ध होण्यासाठी छोटे बंधारे उपयुक्त ठरत असल्याचे गेल्या १० वर्षांच्या अनुभवावरून दिसून आले आहे. बंधाऱ्यांमुळे शेतकºयांना दुबार पीक घेता येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी शहरात स्थलांतर करावे लागत नाही. भूजलपातळी वाढून गावातील विहिरीतून अधिक काळ पाणी मिळते. गावकºयांनी श्रमदान करून दर तीन वर्षांनी बंधाºयातील गाळ काढल्यामुळे मुबलक पाणी मिळू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली.
>भेंडीचा शेतकºयांना आधार
या भागातील शेतकरी पावसाळ्यानंतर पाण्याअभावी त्यांच्या जमिनीत कोणतेही पीक घेऊ शकत नव्हते. मात्र, आता या बंधाºयामुळे ओढ्यानाल्यांमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध असल्याने ग्रामस्थ कडधान्य तसेच भाजीपाला लागवड करू लागले आहेत. सोनगाव, सोनवळे परिसरातील अनेक शेतकरी पावसाळ्यानंतर सेंद्रिय पद्धतीने भेंडीलागवड करू लागले आहेत. सेंद्रिय भेंडीला बाजारात चांगली मागणी असते. नवी मुंबईतील व्यापारी गावात येऊन ही भेंडी घेऊन जातात. नुकत्याच संपलेल्या हंगामात या पंचक्र ोशीतील शेतकºयांनी सुमारे दोन कोटी रुपयांची भेंडी विकली. या पिकाने शेतकºयांना एका हंगामात एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.
>जलवाहिन्यांद्वारे पाणी : सोनगावात कूपनलिकेला चांगले पाणी आहे. त्याद्वारे गावातील पाच घरांमध्ये जलवाहिन्या टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसातील ठरावीक वेळी हे पाणी घरांना उपलब्ध करून दिले जाते. अशा प्रकारे आणखी कूपनलिका खोदून गावातील अन्य घरांमध्येही नळपाणीयोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती रमेश भोईर यांनी दिली.

Web Title: Over the scarcity of Murbad's villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.