उल्हासनगर महापालिकेत पाणी टंचाईवरून राडा; महापालिकेतील अधिकारी लायक नाही - गणपत गायकवाड

By सदानंद नाईक | Published: September 12, 2023 06:40 PM2023-09-12T18:40:02+5:302023-09-12T18:40:32+5:30

शहरातील पाणी टंचाई निवारण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी चुकीचे उत्तर दिल्याचे सांगून त्यांना धारेवर धरले.

over water shortage in Ulhasnagar Municipal Corporation Municipal officials are not worthy | उल्हासनगर महापालिकेत पाणी टंचाईवरून राडा; महापालिकेतील अधिकारी लायक नाही - गणपत गायकवाड

उल्हासनगर महापालिकेत पाणी टंचाईवरून राडा; महापालिकेतील अधिकारी लायक नाही - गणपत गायकवाड

googlenewsNext

उल्हासनगर (ठाणे) : शहरातील पाणी टंचाई निवारण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी चुकीचे उत्तर दिल्याचे सांगून त्यांना धारेवर धरले. महापालिकेतील अधिकारी खुर्चीत बसण्याच्या लायक नसून यांना आता सरळ करतो. असा दम गायकवाड यांनी भरल्याच्या निषेधार्थ कामगार संघटनेने मंगळवारी सकाळी पेन डाऊन आंदोलन केले आहे.

 उल्हासनगरातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या महिन्यात उघोगमंत्री उदय सावंत यांच्या कार्यालयात महापालिका अधिकारी व स्थानिक नेत्यांची बैठक झाली होती. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महापालिका स्थायी समिती सभागृहात सोमवारी बैठक बोलाविली होती. बैठकीला आमदार बालाजी किणीकर, गणपत गायकवाड, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, महावितरण व एमआयडीसी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना कमी पाणी पुरवठ्या बाबत प्रश्न केल्यावर, नियमानुसार पाणी पुरवठा केला जातो. असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. तर महावितरण अधिकाऱ्यांनी विज पुरवठा खंडित होत नसल्याचे उत्तर दिले. एमआयडीसीकडून पाणी पूरवठा नियमानुसार होतो. महावितरण विभागाकडून वीज गुल होत नाही. मग पाणी टंचाई का? असा प्रश्न आमदार गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्यावर, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यावेळी संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच दमात घेतले. महापालिका खुर्चीवर बसण्याची या अधिकाऱ्यांची लायकी नसून त्यांना आता सरळ करतो. असा दम दिला. याप्रकारने महापालिका अधिकाऱ्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिकेतील पाणी टंचाईच्या बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरून दम भरल्याची चर्चा शहरात झाली. याप्रकारच्या निषेधार्थ कामगार संघटनेचे नेते राधाकृष्ण साठे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सकाळी कामगारांनी पेन डाऊन आंदोलन केले. दुपारनंतर महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू होते. पाणी टंचाईच्या बैठकीला आमदार गायकवाड, किणीकर यांच्यासह माजी महापौर मीना आयलानी, भाजपा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चोधरी, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, डॉ सुभाष जाधव एमआयडीसी व महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: over water shortage in Ulhasnagar Municipal Corporation Municipal officials are not worthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.