मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशिन्ससह जिल्ह्यातील निवडणूककामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 06:32 PM2019-08-18T18:32:02+5:302019-08-18T18:39:44+5:30
येथील जिल्हा नियोजन समितीमध्ये बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक आज पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवडणूक उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह निवडणूक कामकाजाशी संबंधीत जिल्ह्यातील अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते
ठाणे : विधान सभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. या कामकाजाचा व तयारीचा आढावा प्रत्यक्ष राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी रविवारी सकाळी ठाण्यात घेतला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन्सच्या गोडाऊन्सची देखील पाहाणी करून संबंधीताना मार्गदर्शन केले.
येथील जिल्हा नियोजन समितीमध्ये बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक आज पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवडणूक उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह निवडणूक कामकाजाशी संबंधीत जिल्ह्यातील अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या आढाव्या पूर्वी प्रथम या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) असलेल्या कोपरी येथील गोदाम क्र.१ ला भेट दिली. यावेळी त्यांनी या निवडणूक मशिन्स संबंधी चाललेल्या कामकाजाची पाहणी केली. या कामात येणाऱ्यां अडचणी समजून घेतल्या. या कामाला वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन ही त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीतील आढाव्या प्रसंगी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये नोंद झालेले दिव्यांग मतदार, त्यांना दिल्या जाणाऱ्यां सुविधा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशिक्षण कार्यक्र म, नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्र ारींवर केलेली कार्यवाही, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे निकाली काढण्याच्या दृष्टीने केलेली कार्यवाही आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला. याशिवाय सिंग यांनी दुबार नोंदणी व मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करणे आदी मुद्यांवरही चर्चा करु न जिल्हह्यातील निवडणूक कामकाज संबंधीच्या अधिकाऱ्यांना माग्रदर्शन केले.