मालक - भाडेकरूंतील वाद विकासाच्या मुळावर

By admin | Published: August 9, 2015 11:17 PM2015-08-09T23:17:15+5:302015-08-09T23:17:15+5:30

कल्याण (पूर्व) प्रभाग.क्र. ५४ मधील लोकग्राम संकुलामध्ये कालिंदी बिल्डिंगजवळ ७०० स्क्वेअर फुटांचे नाना-नानी पार्क व भागीरथी बिल्डिंगसमोर ४००० स्क्वेअर फूट जागेत चिल्ड्रन्स पार्कचे काम सुरू आहे.

Owner - The issue of rent dispute development | मालक - भाडेकरूंतील वाद विकासाच्या मुळावर

मालक - भाडेकरूंतील वाद विकासाच्या मुळावर

Next

दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
कल्याण (पूर्व) प्रभाग.क्र. ५४ मधील लोकग्राम संकुलामध्ये कालिंदी बिल्डिंगजवळ ७०० स्क्वेअर फुटांचे नाना-नानी पार्क व भागीरथी बिल्डिंगसमोर ४००० स्क्वेअर फूट जागेत चिल्ड्रन्स पार्कचे काम सुरू आहे. परंतु, उद्यानाचे काम खासगी जागेत असल्यामुळे रुपये ६५ लाखांची तरतूद केली असतानाही मनपाकडून निधी मिळणार नसल्याचे नवीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी म्हटल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाल्याची माहिती नगरसेविका जान्हवी पोटे यांनी दिली आहे.
या प्रभागातील असंख्य चाळींतील खोल्यांमध्ये भाडेकरू प्रदीर्घ काळ राहत असल्यामुळे मालक व भाडेकरूंमध्ये अनेक ठिकाणी वाद आहेत. त्यामुळे नागरी सुविधा पुरविताना अनेक चाळींमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागल्याचे माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी सांगितले आहे.
प्रभागाची लोकसंख्या १० हजारांच्या आसपास आहे. मागासवर्गीय ४० टक्के, महाराष्ट्रीयन ४० टक्के, मुस्लिम १० टक्के, ख्रिश्चन १० टक्के असे सर्वसाधारण वर्गीकरण आहे. परशुरामवाडी, देवळेकरवाडी, नेहुलकरवाडी, दत्त कॉलनी येथे चाळी तर लोकग्राममध्ये २९ इमारतींची संकुले आहेत.
प्रभागात लोकग्रामचा मोठा नाला आहे. २००५ च्या महापुरानंतर टप्प्याटप्प्याने संरक्षक भिंत बांधण्यात आली. सध्या बांधण्यात आलेली भिंत ९० मीटर लांब व सव्वासहा मीटर उंच आहे. प्रत्येक पावसाळ्यात नालेसफाई केली जाते. लोकग्राम संकुल व चाळींमध्ये यापूर्वी पाणीटंचाई भरपूर होती. परंतु, ३ व ४ इंची जलवाहिन्या नव्याने टाकून पाणीटंचाई दूर केली आहे.
एक सुलभ शौचालय भरवस्तीत असून महिलांची संस्था देखभाल करीत आहे. परंतु, चाळीचाळींमध्ये शौचालय असल्याने त्याचा वापर कमी झाला आहे. २ वर्षांपूर्वीच मलनि:सारण प्रकल्पांतर्गत देवळेकरवाडी, परशुरामवाडी भागात वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.

Web Title: Owner - The issue of rent dispute development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.