घरहक्क परिषद : मालकी हक्काचीच घरे क्लस्टरमध्ये मिळाली पाहिजेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:35 AM2019-08-13T01:35:09+5:302019-08-13T01:35:19+5:30

निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण, ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते.

Ownership rights must be found in the cluster | घरहक्क परिषद : मालकी हक्काचीच घरे क्लस्टरमध्ये मिळाली पाहिजेत

घरहक्क परिषद : मालकी हक्काचीच घरे क्लस्टरमध्ये मिळाली पाहिजेत

Next

ठाणे : निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला खरी माहिती देत नाहीत. कारण, ती त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात असते. एफएसआय व टीडीआरची माहिती दिली पाहिजे. सरकारी जमीन फ्री होल्ड देता येत नाही. क्लस्टरमध्ये जमिनींची मालकी सगळ्यांच्या नावावर नाही. त्यामुळे क्लस्टरमध्ये मालकी हक्काचे घर मिळालेच पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी केली.
ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने रविवारी वागळे इस्टेट भागात घरहक्क परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच ही चळवळ आपण चालविली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यानुसार, जे १० ठराव करण्यात आले आहेत, ते योग्य असून त्याचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिका हद्दीत क्लस्टर योजना राबवली जात असून त्यामध्ये कशा पद्धतीने धूळफेक केली जात आहे, त्याअनुषंगाने ठाणेकरांना ही योजना काय आहे, त्यासाठी या परिषदेचे आयोजन केले होते. बिल्डर इमारत बांधत नाही, तर विविध कंत्राटदार इमारत बांधतात. जो कंत्राटदार बिल्डरची इमारत बांधतो, तो आपल्यासाठीही इमारत बांधेल. याची तयारी जनतेने करावी, पैसे आपणच देतो, तेव्हा बिल्डर घर बांधतो, पण पैसे द्यायला बँका तयार आहेत. सर्व परवानग्या त्याला आपोआपच मिळतात, हे खरे नाही. त्याकरिता एक एजन्सी असते. ते ती काम करते. आपण त्या लवकर आणू शकतो. जे बिल्डर देतो, ते आपणही करू शकतो, हे लक्षात घ्या म्हणून स्वयंविकास हेच धोरण योग्य आहे. ते आपण करा, म्हणजे आपणास ३२३ काय ६०० फुटांचे घर मिळू शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अ‍ॅड. सुनील दिघे यांनी विविध कायदेविषयक अनेक तरतुदी व धोक्याचे इशारे काय आहेत, हे समजावून सांगितले. बदलत्या काळात आपण जागरूक राहावे, संघटित राहावे, असेही त्यांनी सांगितले. परिषदेचे अध्यक्ष उन्मेष बागवे यांनी नागरिकांच्या नव्या संघर्षाची ही सुरुवात असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना सर्व ठराव मंजूर करून घेतले. त्या अनुषगांने हे ठराव आता मुख्यमंत्र्यांपासून ठाण्यातील सर्व आमदारांना दिले जाणार असून, वेळप्रसंगी यासाठी आंदोलनही उभे केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Ownership rights must be found in the cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.