उल्हासनगरात पुरेशा व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:23 AM2021-03-30T04:23:57+5:302021-03-30T04:23:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड पुरेसे असून, रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका ...

Oxygen bed with adequate ventilator in Ulhasnagar | उल्हासनगरात पुरेशा व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड

उल्हासनगरात पुरेशा व्हेंटिलेटरसह ऑक्सिजन बेड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड पुरेसे असून, रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान व उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली. रुग्णसंख्या वाढत असल्याने, महापालिका शाळा क्र. २९ मध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्याचे संकेत आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिले.

उल्हासनगर व शेजारील शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सुरुवातीला महापालिकेला यश आले. मात्र, काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रविवारी रुग्णांचा आकडा २०० पार गेला, तर एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा जास्त झाली. रुग्णांची संख्या वाढत असल्याने, महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, कॅम्प नं.३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेजवळील महापालिका शाळेचे रूपांतर आरोग्य केंद्रात करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी पगारे यांनी दिली. महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, खाजगी साई प्लॅटिनम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाडे तत्त्वावर घेतले असून त्यात २०० बेड ऑक्सिजन व १७ बेड व्हेंटिलेटरचे आहेत.

रेडक्रॉस रुग्णालयात ६२ बेड ऑक्सिजनचे असून तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे रूपांतर आरोग्य केंद्रात केले आहे. त्याठिकाणी २२३ बेड सज्ज करून ठेवले आहेत. तर, टाटा आमंत्रामध्ये ४२५ बेड असून कॅम्प नं-३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेजवळील महापालिका शाळेचे रूपांतर आरोग्य केंद्रात केल्याची माहिती महापौर लीलाबाई यांनी दिली. तर, आयटीआय इमारतीसह महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणाचे काम सुरू असल्याची अरुण अशान यांनी माहिती दिली. सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांसाठी पुरेसे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड आहेत.

महापालिका आरोग्य पथक तैनात

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे एक आरोग्य पथक तैनात केले असून कोरोना रुग्णांवर ते लक्ष ठेवून आहे. तसेच कोणार्क संकुलाशेजारी महापालिका लॅबमध्ये कोरोना चाचण्या होत असल्याने रुग्णांचे निदान अवघ्या २४ तासांत मिळत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली.

- रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित

भंडारा जिल्ह्यानंतर मुंबई येथील रुग्णालयाला आग लागून जीवितहानी झाल्याने अग्निशमन यंत्रणेचा विषय चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी शहरातील महापालिका कोविड रुग्णालयांसह एकूण ६१ रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती दिली.

Web Title: Oxygen bed with adequate ventilator in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.