ठाणेकरांसाठी बारामती आली धावून! बारामती अ‍ॅग्रोकडून ठाणे मनपाला ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान, रोहित पवारांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 05:23 PM2021-05-20T17:23:51+5:302021-05-20T17:24:20+5:30

यशस्वी उद्योजकतेला समाज कार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड सातत्याने करत आली आहे.

oxygen concentrator help from baramati agro to thane municipal corporation rohit pawar took initiative | ठाणेकरांसाठी बारामती आली धावून! बारामती अ‍ॅग्रोकडून ठाणे मनपाला ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान, रोहित पवारांचा पुढाकार

ठाणेकरांसाठी बारामती आली धावून! बारामती अ‍ॅग्रोकडून ठाणे मनपाला ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान, रोहित पवारांचा पुढाकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे -यशस्वी उद्योजकतेला समाज कार्याची जोड देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड सातत्याने करत आली आहे. हाच दृष्टिकोन कायम ठेवत कोरोनाच्या परिस्थितीत बारामती अ‍ॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने ठाणे महानगर पालिकेला राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपेे यांच्या हस्ते ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर प्रदान करण्यात आले. यावेळी ठामपाचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण हे उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे उपक्रम हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकाच वेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा कोरोना रुग्णांना चांगला लाभ होतो. त्यामुळेच   बारामती अ‍ॅग्रो कंपनी आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने पाच लिटरचे तीन आणि  ते सात लिटरचे पाच असे आठ ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर ठामपाचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे परांजपे यांनी सुपूर्द केले.

यावेळी परांजपे यांनी,  बारामती अ‍ॅग्रोकडून राज्यभरात या आधी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी ठाणे पालिकेलाही ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर हे रुग्णा हजार लिटर सॅनिटायझर देण्यात आले होते. आता बारामती अ‍ॅग्रोने राज्यात  ५०० ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर दिले आहेत. त्यापैकी 8 ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर ठाणे पालिकेला दिले आहेत. मात्र, सद्याची अवस्था पाहता आ. रोहित पवार यांनी आणखी ऑक्सिजन काँन्स्ट्रेक्टर ठाण्याला द्यावेत, अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी  परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, उप आयुक्त संदीप माळवी, विश्वनाथ केळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवाध्यक्ष विक्रम खामकर,  सरचिटणीस रविंद्र पालव ठाणे विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रायलादेवी ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे ,कार्यालयीन सह  सचिव संकेत नारणे आदी उपस्थित होते.

Web Title: oxygen concentrator help from baramati agro to thane municipal corporation rohit pawar took initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.