Oxygen : 'ऑक्सिजन बँके'च्या माध्यमातून रुग्णांना मिळणार मोठा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:20 AM2021-05-02T08:20:34+5:302021-05-02T08:21:15+5:30

Oxygen: अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oxygen: Patients will get great relief through 'Oxygen Bank', eknath shinde | Oxygen : 'ऑक्सिजन बँके'च्या माध्यमातून रुग्णांना मिळणार मोठा दिलासा 

Oxygen : 'ऑक्सिजन बँके'च्या माध्यमातून रुग्णांना मिळणार मोठा दिलासा 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

ठाणे : कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बँक योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. एमएमआर रीजन मध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे अवघड आहे. 

अनेकदा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत त्यांची तब्येत खालावते. अशा गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.  या ऑक्सिजन बँकेत सुरुवातीला  पाच लिटर क्षमतेच्या १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येणार असले तरी  कालांतराने दहा लिटर क्षमतेचेऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ठेवण्यात येतील, असे एकनाथ  शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्स द्वारेहवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन त्यातील नायट्रोजन वेगळा करुन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्ष याच्या माध्यमातून ही सेवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील गरजू रुग्णापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. 

कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण दररोज ऐकत आहोत. अशात डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सूरु केलेला हा उपक्रम निश्चितच पथदर्शी ठरेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, ऑक्सिजन बँकेच्या या लोकार्पण सोहळ्याला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. गरजू कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी या ऑक्सिजन बँकेचा लाभ घेण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी ठाणे पूर्व येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Oxygen: Patients will get great relief through 'Oxygen Bank', eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.