Oxygen: ठाणे  जिल्हा शासकीय रुग्णालयही राबविणार ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 03:38 PM2021-04-24T15:38:55+5:302021-04-24T15:42:23+5:30

५ मे र्पयत होणार कार्यान्वित, दिवसाला २२५ जम्बो सिलेंडर गॅस होणार तयार

Oxygen production project to be implemented by Thane District Government Hospital | Oxygen: ठाणे  जिल्हा शासकीय रुग्णालयही राबविणार ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प

Oxygen: ठाणे  जिल्हा शासकीय रुग्णालयही राबविणार ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प

Next

ठाणे  : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल आणि पार्कीग प्लाझा येथे ऑक्सिजनचा प्रकल्प उभारणीला सुरुवात केली असतांना आता ठाणे  जिल्हा शासकीय रुग्णालय देखील आता ऑक्सिजनचा निर्मितीचा प्रकल्प राबविणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पातून दर दिवशी २२५ जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे येथे उपचार घेत असलेल्या शेकडो रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे.  

मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. परंतु यावर मात करण्यासाठी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती करुन ऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत ठाणे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्कीग प्लाझा येथे ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट उभारले जात आहेत. पार्कीग प्लाझा येथील प्लान्ट दोन ते तीन दिवसात कार्यान्वित होणार आहे. त्यातून १५ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.

त्यापाठोपाठ आता ठाणे  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुद्धा अशाच प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे  जिल्हा नियोजन समतिीच्या निधीतून जिल्हा रु ग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा  प्रकल्प उभारला जाणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे हवेतून प्राणवायुची निर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पासाठी १ कोटी ९० लाख इतका खर्च येणार आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दररेज १६ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासते. या रुग्णालयाला रायगड आणि नवी मुंबईतील रबाळे भागातून टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. असे असले तरी, सद्यास्थितीत राज्यात सर्वत्न ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून ही बाब लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ३०० बेड कार्यान्वित असून सध्या येथे सुमारे २५० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी ३९ आयसीयुचे बेड असून २५ व्हॅन्टीलेटरचे आणि उर्वरीत ऑक्सिजनचे बेड आहेत. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयाला हा वाढीव ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे.

त्यानुसार जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे २२५ जम्बो सिलेंडर भरतील इतक्या ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणा:या रु ग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणारा नसून रु ग्णांना ऑक्सिजन अभावी स्थलांतरीत करण्याची वेळ देखील ओढवणार नाही. तसेच हा प्रकल्प ५ मे पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्णांना स्थलांतरीत करण्याची वेळ येणार नाही. त्यानुसार आता या प्रकल्पाचे काम सुरु झाले असून ५ मे रोजी हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

Web Title: Oxygen production project to be implemented by Thane District Government Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.