Oxygen Shortage: ऑक्सिजन न मिळाल्याने ठाण्यात ४ रुग्ण दगावले; नातेवाईकांचा आरोप हॉस्पिटलने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:42 PM2021-04-26T12:42:51+5:302021-04-26T13:08:50+5:30

Oxygen Shortage, corona virus in Thane: ठाण्यातील वर्तक नगर येथील खाजगी कोविड हॉस्पिटल वेदांत रुग्णालयात ही घटना घडली आहे. रुग्णालयाखाली नातेवाईक आणि मनसे, भाजप पक्षाचे पदाधिकारी जमले असून रुग्णालया बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Oxygen Shortage: 3 patients died due to lack of oxygen; Vedant hospital denied the relatives' allegations | Oxygen Shortage: ऑक्सिजन न मिळाल्याने ठाण्यात ४ रुग्ण दगावले; नातेवाईकांचा आरोप हॉस्पिटलने फेटाळला

Oxygen Shortage: ऑक्सिजन न मिळाल्याने ठाण्यात ४ रुग्ण दगावले; नातेवाईकांचा आरोप हॉस्पिटलने फेटाळला

googlenewsNext

ठाण्यातील वर्तक नगर नाक्यावरील वेदांत या खाजगी कोरोना रुग्णालयातील 4 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला असल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असल्याने हॉस्पिटलच्या  बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठाणे महापालिकेचे अधिकारी देखील रुग्णालयात पोहचले आहेत.रुग्णालय प्रशासनाने मात्र तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची कबुली दिली असून हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे रुग्णालयाच्या वगीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra | Four #COVID19 patients died at Vedanta hospital in Thane early morning today. An investigation has been initiated to ascertain the cause of their death: Thane Municipal Corporation)


      वर्तकनगर नाक्यावर वेदांत या खाजगी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन अभावी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचा मॅसेज  व्हायरल झाला. त्यानंतर हॉस्पिटल मधील रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. प्रकरण वाढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला . घटनास्थळी आलेले आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रकारणची चौकशी करण्याची मागणी केली असून सर्व गैरव्यवहाराची चौकशी सिव्हिल सर्जन मार्फत करण्याची मागणी केली आहे. आम्ही दोन दिवस डॉक्टरांच्या संपर्कात होतो , पैसे भरून देखील योग्य ट्रीटमेंट मिळत नव्हती .




 रात्री आमचे डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टर बोले पीपीई किट्स घालून आम्हाला भेटण्यासाठी परवानगी देईल असे सांगण्यात आले.दरम्यान  सकाळी अचानक मृत्यू झाला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले असून  ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक साधना पाटील यांनी केला आहे . ठाणे महापालिका प्रशासनामार्फत मात्र अजून काही खुलासा करण्यात आला नाही .तर यासंदर्भात वेदांत हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.अजय सिंग यांच्याशी संपर्क साधला असता केवळ तीन मृत्यू झाला असुन हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ऑक्सिजनचा मीठ टॅंक संपला होता मात्र जम्बो टॅंक शिल्लक होता.आय सी यु मधे 25 ते 30 गंभीर रुग्ण असून 12 तासांत हे तीन मृत्यू झाले असल्याचे सिंग यांनी सांगितले .

 रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 53 रुग्ण दाखल असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले नाही. तसेच रुग्ण दगावण्याचा घटना या पहाटे चार ते सकाळी 9 या कालावधीत मृत्यू झाले आहेत. 
      - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा.

Read in English

Web Title: Oxygen Shortage: 3 patients died due to lack of oxygen; Vedant hospital denied the relatives' allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.