पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:00 AM2020-01-21T00:00:16+5:302020-01-21T00:00:42+5:30

धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत.

Paadale dam victims waighting for relief fund, injustice with 162 farmers | पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

Next

- श्याम राऊत
मुरबाड : तालुक्यातील पाडाळे येथे भामखोर नदीवर ८० कोटी ७१ लाख खर्चून महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागाने २०१३ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. तीन वर्षे त्यांच्या नशिबी शासनदरबारी हेलपाटे सुरूच आहे.आतापर्यंत त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. त्यामुळे या धरणाचे पाणीच ग्रामस्थांनी रोखून धरल्यामुळे या परिसराला सिंचनाचाही फायदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आत्महत्येची वाट पाहत आहात का, असा सवाल करत शेतक-यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सरळगाव परिसरातील पाडाळे, ठुणे, माजगाव, मानिवली, कान्हार्ले, कळंभे, तळवली, नांदगाव, नागाव, पारतळे, सरळगाव आणि नेवाळपाडा या गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या धरणाला १९८३-८४ ला मान्यता मिळाली तेव्हा त्याचा अंदाजित खर्च एक कोटी ७२ लाख १४ हजार रुपये होता. या धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा या धरणाचा खर्च ८० कोटींहून अधिक रकमेवर पोहचला. टप्प्या-टप्प्यांमध्ये वाढ झालेल्या खर्चामुळे ठेकेदार मालामाल झाले, मात्र या धरणाच्या कालव्यांसाठी आपल्या उपजाऊ जमिनी देणारे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. तोंडी आश्वासन देऊ न कालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आल्या.

मात्र काम पूर्ण झाले तरी त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी संतप्त झाले असून तीन वर्षांपासून सतत अर्ज विनंत्या, उपोषण, अंदोलन करून थकले; पण भरपाई मिळालेली नाही.गेल्या वर्षी तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकºयांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तेव्हा आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

कथोरे यांनी शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला आदेश दिले; मात्र या आदेशांनाही केराची टोपलीच मिळाली आहे. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेसचे तालुका चिटणीस गुरु नाथ पष्टे यांनी तहसीलदारांना दिला आहे. तर पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली की ११ कोटी रु पये मंजूर असून खाजगी वाटाघाटींद्वारे हा प्रश्न सोडवला जाईल, असे नेहमीच उत्तर दिले जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

...तर आत्महत्या करावी लागेल!
शासनातर्फे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मुरबाडचे तत्कालीन तहसीलदारांनी दोन वर्षांपूर्वी १६२ शेतकºयांना कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांना वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मार्गावर शासन ढकलत असल्याचा आरोप मुरबाड तालुका काँग्रेसचे चिटणीस गुरुनाथ पष्टे यांनी केला आहे.

पाडाळे धरणाचे कालव्यासाठी संपादित केलेल्या १६२ शेतकºयांचा प्रश्न खाजगी वाटाघाटीने सोडवला जाईल. यासाठी ११ कोटी रु पये मंजूर असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल.
- नीलकमल गवई  
(उपविभागीय अभियंता, पाडाळे धरण)
 

Web Title: Paadale dam victims waighting for relief fund, injustice with 162 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.