वाड्यातील भातशेती झाली परवडेनाशी

By admin | Published: July 28, 2015 11:31 PM2015-07-28T23:31:52+5:302015-07-28T23:31:52+5:30

जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला. पुर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरेनुसार शेतातील देवांना

Paddy cultivation in the castle | वाड्यातील भातशेती झाली परवडेनाशी

वाड्यातील भातशेती झाली परवडेनाशी

Next

वाडा : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला. पुर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरेनुसार शेतातील देवांना ‘पोळी-भाजी’चा नैवेद्य देवून शेतकऱ्यांनी कामांना सुरूवात केली. मात्र एकाच वेळी सर्वच तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरूवात झाल्याने मजूरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहुन मजूर आणावे लागतात. त्यात मजूरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेत मजुराला दररोज २५० ते ३०० रूपये व दुपारच्या जेवणाचा खर्च द्यावा लागतो. या सर्व कारणांमुळे शेती व्यवसाय हा जास्त कष्टाचा आणि खर्चीक होऊ लागला आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नसल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.
नाले, बंधारे असणाऱ्या ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अशा क्षेत्रांची फारशी उपलब्धता नाही तरीही वनराई बंधारे, के. टी. बंधारे, रानतळी अशा स्वरूपात काही प्रमाणावर पाण्याचा साठा असणारे ४० स्त्रोत उपलब्ध आहेत. तालुक्यात अलीकडे काही भागातून आंबा, केळी, पेरू, काजु, पपई अशा फळबागा होत असून बरेचसे शेतकरी बागायती शेती करू लागले आहेत.
पाच नद्या या तालुक्यातून वाहत असून बाराही महिने त्यांना पाणी असते असे नैसर्गिक संपत्तीचे वरदान या तालुक्याला लाभले आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या होती. १९९५ पासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे नदी व खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्यासाठी शेकडो मजूर जातात. भातशेतीसाठी पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षापासून मिळत नसल्याने भातपिकाची लागवड कशी करायची असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. भात लावणीसाठी जिल्ह्णात कोठेही यांत्रिक अवजारे नाहीत. काही जिल्ह्णात कृषी विद्यापीठाने तयार केलेली भात लावणी यंत्रे महागडी असल्याने शेतक ऱ्यांना परवडू शकत नाहीत. त्यामुळे भातशेती संकटात सापडली आहे.
१९९५ पासून वाड्यात पसंतीत असलेल्या औद्योगिक कारखानदारीने बेसुमार भर पडत असूनही शासन त्यांना कोट्यावधीच्या सवलती देवून व कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. परिणामी या तालुक्यातील तांदुळ, सुपिक जमीन कारखान्यांच्या पायाखाली तुडवली जाऊन नापीक झाली. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शेतकऱ्यांनी आपल्या सोन्यासारख्या जमीनी कारखानदारांना विकून टाकल्या आहेत. आजही ती स्पर्धा सुरूच आहे. यामुळे भाताचे कोठार हा मान लयाला जाऊ शकतो.

वाडा तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे असून १५३३५ हेक्टर क्षेत्र आजही भात पिकाखाली आहे. त्यापैकी १३८०० हेक्टर क्षेत्र हे पूर्ण पावसावर अवलंबून असणारे क्षेत्र आहे. येथील शेतकरी वाडा कोलम, झिनी, सुरती, गुजरात ११, गुजरात ०४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत व मसुरी आदी भातांच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात. वाड्यात ४२५ हेक्टर क्षेत्रात नांगलीचे उत्पन्न घेतले जाते. ९५० हेक्टर क्षेत्रात कडधान्य, १६० हेक्टर क्षेत्रात गळीत धान्य तर अन्य रब्बी पिके ३० हेक्टर क्षेत्रामध्ये घ्ोतली जातात.

ठाणे जिल्ह्णातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून फार पुर्वी प्रसिद्ध आहे. येथील जमिन पाणी धरून ठेवणारी असल्याने भाताचे उत्तम पीक वाडा कोलम हा वाड्यातील प्रसिद्ध तांदुळ आजही बाजार पेठेत होता मात्र अलीकडे वाडा कोलम प्रतिकृती गुजरात व अन्य ठिकाणाहून मिळत असल्याची चर्चा ऐकायला मिळते. मात्र स्थानिक शेतकरी आजही वाडा कोलम प्रत टिकून आहे.

Web Title: Paddy cultivation in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.