पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी सनातन धर्माला दिली आंतरराष्ट्रीय ओळख; युनायटेड किंग्डमच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स पार पडला सोहळा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 1, 2024 05:57 PM2024-06-01T17:57:29+5:302024-06-01T17:57:45+5:30
श्री आदिशंकराचार्यांच्या शिकवणींचा प्रसार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सनातन धर्माचे महान शिक्षक, गुरु आणि तत्वज्ञ गुरु शंकराचार्य यांनी रचलेल्या ग्रंथांची श्रृंखला असलेल्या ‘ दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य’ या सांगितीक मालिकेचे आपल्या सुमधुर वाणीतून सादरीकरण करीत पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी सनातन धर्माला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून दिली. ब्रिटीश संसदेतील युनायटेड किंग्डम येथील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये हा बहुसांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल आणि बांग्लादेशी संगीतकार आसिफ अली यांच्या संयुक्त अल्बमचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. ठाणे शहरासोबत आत्मीयतेचे नाते असलेल्या अनुराधा पौडवाल यांच्या चाहत्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे आयोजन हे ब्रिटीश पार्लमेंटच्या खासदार सीमा मल्होत्रा, विम्बल्डनचे लॉर्ड तारीक अहमद, मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर मिडल इस्ट, नॉर्थ अफ्रिका, साऊथ एशिया, युनायटेड नेशन्स आणि दि कॉमनवेल्थ, प्राईम मिनिस्टर्स स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह फॉर प्रिव्हेंटिंग सेक्शुअल व्हॉयलन्स इन कॉन्फ्लिक्ट, श्री. गोपी हिंदुजा, हिंदुजा ग्रुप चे प्रमुख आणि अनेक मान्यवर प्रेक्षक उपस्थित होते. या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना पौडवाल म्हणाल्या की, “ सनातन धर्माची अधिकतर वेळी चुकीची व्याख्या केली जाते. पण सत्य हे आहे की हे तत्वज्ञान कालातीत आणि वैश्विक तंत्वज्ञान आहे जे वैयक्तिक बलस्थाने, सुसंवाद आणि सर्वसमावेशक पध्दतीचा प्रसार करतात. त्यांची शिकवण ही मानसिक शांतता, अध्यात्मिक वाढ आणि सर्व प्राणिमात्रांच्या परस्पर संबंधांना महत्त्व देते. या मुल्यांचा प्रसार करुन त्यांची शिकवण ही जगभरांतील विविध संस्कृतींनी एकाच मंचावर एकत्र येऊन एकमेकांचा सन्मान आणि समजून घेण्यावर भर दिला जातो. जगभरांतील प्रेक्षकांसमोर शांतीचा आणि एकतेचा हा संदेश प्रसारीत करण्यासाठी मी वचनबध्द आहे.”