पै फ्रेंड्स लायब्ररीचे ३५ व्या वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:40 AM2021-05-23T04:40:31+5:302021-05-23T04:40:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: २२ मे १९८६ रोजी डोंबिवली शहरात टिळकनगरमध्ये अवघ्या १०० पुस्तकांनी पै फ्रेंड्स लायब्ररीची सुरुवात ...

Pai Friends Library debuts in its 35th year | पै फ्रेंड्स लायब्ररीचे ३५ व्या वर्षात पदार्पण

पै फ्रेंड्स लायब्ररीचे ३५ व्या वर्षात पदार्पण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: २२ मे १९८६ रोजी डोंबिवली शहरात टिळकनगरमध्ये अवघ्या १०० पुस्तकांनी पै फ्रेंड्स लायब्ररीची सुरुवात झाली असून शनिवारी ३५ व्या वर्षात पदार्पण केले. वाचन संस्कृती टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करीत आहे.

पहिल्या वर्षी ७२ वाचकांनी सभासदत्व घेतले; पण पुस्तकांच्या कमतरतेमुळे ४० सभासद सोडूनही गेले. तरीही कुठेही न थांबता पै फ्रेंड्स लायब्ररीमध्ये पुस्तकांची संख्या वाढतच गेली. पुस्तकांसोबतच सभासद संख्याही वाढत जाऊन आज लायब्ररीमध्ये साडेतीन लाख पुस्तके आहेत, २० हजारांहून अधिक समाधानी वाचक सदस्य आहेत. लायब्ररीचा विस्तार डोंबिवलीबरोबरच संपूर्ण मुंबई, पुणे आणि नाशिक शहरात आहे. या शहरात लायब्ररी वाचकांना घरपोच पुस्तक सेवा देते. लायब्ररीचे वर्षभर वाचकांसाठी निरनिराळे उपक्रम चालू असतात. त्यामध्ये फ्रेंड्स कट्टा, लेखक बाल-वाचक महोत्सव, पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन, दिवाळी अंकांचे पूजन, लहान मुलांसाठी ‘फंडू’ सुटी विशेषांक, पुस्तक प्रकाशन सोहळा, २४ बाय ७ अभ्यासिका, वाचकोत्सव, फ्रेंड्स प्रकाशन १ जानेवरी २०१५ रोजी एका दिवसात १०२१ सभासद नावनोंदणी करून थेट लिम्का बुक रेकॉर्ड असे विविध उपक्रम लायब्ररी राबवत असते.

या कोविड काळामध्ये वाचकांचे वाचन अखंडित राहावं या दृष्टिकोनातून प्रत्येक सभासदाला सहा पुस्तके देण्यात येत आहेत. वाचकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे संस्थापक पुंडलिक पै यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

Web Title: Pai Friends Library debuts in its 35th year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.