खासगी रुग्णालयात सशुल्क कोरोना लसीकरणास आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:01+5:302021-03-09T04:44:01+5:30
कल्याण : ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील कोरोना लसीकरणाची सुरुवात सोमवारपासून ...
कल्याण : ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील कोरोना लसीकरणाची सुरुवात सोमवारपासून झाली आहे.
डोंबिवलीतील आर. आर. रुग्णालय, एम्स रुग्णालय, टिटवाळ्यातील श्री महागणपती रुग्णालय, कल्याण पश्चिमेतील ईशा नेत्रालय याठिकाणी शुल्क आकारुन लसीकरणाची सुविधा खुली करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी या खासगी रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.
त्याचबरोबर महापालिकेतर्फे रूक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालय, पाथर्ली शाळा, आर्ट गॅलरी याठिकाणी विनामूल्य कोविड लसीकरणाची सुविधा ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधी असलेले आणि ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध केली आहे, तसेच कल्याण पूर्व भागातील शक्तीधाम क्वारंटाईन सेंटर, डोंबिवलीतील क्रीडा संकुल याठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी लाल चौकी येथील आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये आज महिला दिनानिमित्त सकाळी १० ते ५ या वाळेत फक्त ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांना विनामूल्य कोरोनाची लस देण्यात आली.
----------------------------
वाचली