झळा ज्या लागल्या जीवा , पारा ४५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:04 AM2018-03-27T01:04:05+5:302018-03-27T01:04:05+5:30

राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणामी सोमवारी ठाणे जिल्ह्यात तापमानाने कहर केला

Painted chords, mercury at 45 degrees | झळा ज्या लागल्या जीवा , पारा ४५ अंशांवर

झळा ज्या लागल्या जीवा , पारा ४५ अंशांवर

Next

ठाणे : राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणामी सोमवारी ठाणे जिल्ह्यात तापमानाने कहर केला. बहुतांश शहरांचे तापमान ४४ ते ४५ अंशांदरम्यान गेल्याने अंगाची काहिली झाली. दुपारच्या वेळी रहदारीही थंडावली. उष्णतेची ही लाट मंगळवारीही कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उष्ण वाऱ्यांच्या झळांमुळे रविवारपासूनच ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती. ते ४२ ते ४४ अंशांदरम्यान होते. सोमवारी मात्र पारा आणखी चढत गेला आणि जिल्ह्यातील प्रमुख शहरांचे तापमान ४४ ते ४५ अंशांपर्यंत पोचले. तापमान वाढत गेल्याने सकाळी ११ ते साडेअकरानंतर उष्म्याच्या लाटा जाणवू लागल्या. लोकलमध्ये, बस किंवा रिक्षेसारख्या वाहनांत येणाºया झळांनी जीव नकोसा झाला. रहदारी मंदावली. दुकानांतील गर्दी रोडावली. काही दुकाने तर दुपारच्या वेळेत बंदही करण्यात आली. वातानुकूलन यंत्रांचाही फारसा उपयोग होत नसल्याचे जाणवत होते.
सतत कोरड पडत असल्याने बाटलीबंद थंड पाण्याची मागणी प्रचंड वाढली. वेगवेगळ््या रेल्वे स्थानकांत मिळणाºया शुद्ध पाण्याच्या काऊंटरसमोर अक्षरश: रांगा लागल्या. ताक, सरबते, पन्हे, ऊसाचा रस पिण्यासाठी गर्दी झाली. कुल्फी, आइस्क्रिम, फालुदा, पियुष, लस्सी पिणाºयांचे प्रमाण वाढले. वेगवेगळ््या रूग्णालयांनी, पालिकांच्या आपत्कालीन विभागांनी उषण्तेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत.

घटलेली झाडे कारणीभूत
कमी झालेले झाडांचे प्रमाण, घटलेले हरीत पट्टे, ठिकठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक, काँक्रिटचे रस्ते, सर्वत्र सुरू असलेली बांधकामे, जलाशयांचे घटलेले प्रमाण यामुळे तापमानाच्या झळा आणखी जाणवत असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.

सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान उन्हात फिरू नका.
आवश्यकता नसली, तरी भरपूर पाणी प्या.
सरबते, शहाळ््याचे पाणी, निरा, ताक, पन्हे, ऊसाचा रस यासारखी शक्यतो नैसर्गिक पेय प्या.
टोपी, रूमालाने डोके झाकून घ्या. गॉगल वापरा
चेहरा पुसण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.
कलिंगडासारखी रसदार फळे, काकडी यांचे सेवन करा.
सौम्य रंगाचे, सैल, सुती कपडे वापरा.
उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागल्यास लगेचच सावलीत जा.
फारच अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पशु-पक्ष्यांसाठीही पुरेसे पाणी ठेवा.
उष्ण वारे अंगावर येत असतील, तर त्यापासूनही काळजी घ्या.

Web Title: Painted chords, mercury at 45 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.