रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:26 AM2020-08-24T02:26:41+5:302020-08-24T02:28:00+5:30

यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत.

Painting competitions for patients; Ganeshotsav celebrated in a unique way at Kovid Hospital | रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा

रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्या ठिकाणी सेवा देणारे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांनी अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यावेळी रुग्णांसाठी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि रुग्णांनी मोठ्या आवडीने या स्पर्धेत सहभाग घेतला.

अंबरनाथमध्ये पालिकेद्वारे दंत महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयामधील रुग्णांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन कोरोनामुळे अंधारमय झालेल्या आपल्या भविष्यात अनेक रंग भरले. रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी एकूण ८१ रुग्णांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. रुग्णांनी कोरोनाची भीती दूर सारत विविध चित्रे रेखाटत स्पर्धेचा आनंद लुटला.

यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. परंतु, ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांना एकाकीपणा वाटू नये आणि त्यांनीही गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, या हेतूने रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्व रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सर्वांनी रुग्णालयात असणाऱ्या गणेशमूर्तीचे पूजन व आरती केली आणि त्यानंतर स्पर्धेत सर्व वयोगटांतील रुग्णांनी अगदी आनंदाने भाग घेतला. यातील सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षांच्या आजींनीही सहभाग नोंदवला आणि बक्षीसही पटकावले. रुग्णालयात गणेशाची मूर्ती असून त्या मूर्तीचे दररोज पूजनही केले जात आहे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी गणेशाची आरती करतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रुग्णालयाला भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अनेक भाविक हे गणेशोत्सवात मग्न असतात. त्यातील काही भाविक कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या भक्तीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. केवळ स्पर्धेच्या माध्यमातून रुग्णालयात भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न होता. - प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

Web Title: Painting competitions for patients; Ganeshotsav celebrated in a unique way at Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.