ठाणे जिल्ह्यातील शहरांसह गांवखेड्यांतील १७६००० बालकांना पाेलीओचा खुराक!
By सुरेश लोखंडे | Published: December 7, 2023 06:25 PM2023-12-07T18:25:04+5:302023-12-07T18:25:12+5:30
जिल्ह्यातील शहरं व गांवखेडी पाेलीओ मुक्त करण्यासाठी जिल्ह्याभरात १० डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण माेहीम हाती घेण्यात आली आहे.
ठाणे : जिल्ह्यातील शहरं व गांवखेडी पाेलीओ मुक्त करण्यासाठी जिल्ह्याभरात १० डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण माेहीम हाती घेण्यात आली ाहे. यामध्ये ग्रामीणमधील अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी व कल्याण तालुक्यातील गांवासह बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका या शहरांमधील बालके मिळून तब्बल एक लाख ७६ हजार ४२९ बालकांना हा पाेलीओ मुक्तीचा डाेक्स दिला जात आहे.
या बालकांचे पोलिओ लसीकरण करुन त्यांचे आरोग्य सुदृढ ठैवण्यासाठी पालकांनी त्यांच्या बालकासह हा डाेस आवश्यक द्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार तालुक्यातील पाच वर्षा पर्यंतच्या एकुण एक लाख सात हजार ८३४ बालकांना हा डाेस देण्याचे निश्चित केले आहे. तर शहरी भागातील एकुण ६८ हजार ५९५ बालकाना हा डाेस पाजला जाणार आहे. यासाठी एक हजार ४१२ बुथवर बालकांना हा डाेस दिला जाणार आहे. त्यासाठी तीन हजार ४७८ कर्मचारी ही माेहीम पार पाडणार आहे. रविवारी या बुथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात तीन दिवस व शहरांमध्ये पाच दिवस कर्मचारी घराेघर जावून हा डाेस बालकांना पाजणार असल्याचे ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.