आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात पालघर मागेच

By Admin | Published: August 9, 2015 11:11 PM2015-08-09T23:11:07+5:302015-08-09T23:16:11+5:30

राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत

Palghar back to take advantage of the health plan | आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात पालघर मागेच

आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात पालघर मागेच

googlenewsNext

पंकज रोडेकर , ठाणे
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत. योजनेचा लाभ घेण्यात ठाण्याने आघाडी मारली आहे. तसेच ४६ ते ५५ वयोगटांतील व्यक्तींनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसते.
गरीब, गरजू व्यक्तींना अत्याधुनिक व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता शासनाने १३ जुलै २०११ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यातील गडचिरोली, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबईसह उपनगर या आठ जिल्ह्यांत सुरू केली. तसेच दारिद्रयरेषेखालील आणि दारिद्रयरेषेवरील (पांढऱ्या शिधापत्रिकाधारक वगळून) नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेत यावा, याकरिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्र म) व नॅशनल इन्शुरन्स कं.लि.यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध ९२७ शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येतो. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील एकूण ४१ रुग्णालयांना या योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ठाणे सिव्हील, उल्हासनगर मध्यवर्ती आणि भिवंडी उपजिल्हा या शासकीय रुग्णालयांसह ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ३७ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात ४४७ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याने ६३ लाख ७९ हजार ६०० रुपये येथे जमा झाले आहेत. यासाठी ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांसह मनपा व नगरपालिका क्षेत्रांमधील एकूण ३२ हजार ८५३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी कागदपत्र पूर्ततेअभावी दोन हजार २६८ जणांचे अर्ज नाकारले. तर, तीन हजार ६२६ जणांचे अर्ज काही कागदपत्रां अभावी रद्द केल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रुग्ण लाभार्थी ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात सर्वाधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

Web Title: Palghar back to take advantage of the health plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.