पालघर विभागाला ९५ लाख १३ हजारांचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:18 AM2019-08-07T01:18:58+5:302019-08-07T01:19:14+5:30
मुसळधार पावसाने बसफेऱ्या रद्द; परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात ८ आगार; आर्थिक गणित कोलमडणार
- हितेन नाईक
पालघर : राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत आगारातून दररोज ४२५ बस गाड्यांच्या ३ हजार ३७४ फेरीद्वारे १ लाख ४३ हजार कि.मी.चा पल्ला गाठला जातो. मात्र, आठवडाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर विभागाच्या ३ हजार ६१३ फेºया रद्द झाल्या. यामुळे महामंडळाला सुमारे ९५ लाख १३ हजार ९९ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
पालघर जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे एकूण आठ बस आगार (डेपो) आहेत. १ आॅगस्टपासून जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होत स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या हजारो फेºया रद्द झाल्या आहेत. ३ आॅगस्ट रोजी पालघर आगारातील २२२ बस फेºया रद्द झाल्या असून १० हजार ९२० कि.मी. रद्द झाले आहेत तर ४ आॅगस्ट रोजी ३६४ बस फेºया रद्द होत १५ हजार ८७० किमी तर ५ आॅगस्ट रोजी ३१ फेºया रद्द होत ३ हजार ०९ कि.मी. रद्द झाले आहेत.
सफाळे आगारातील ३ आॅगस्ट रोजी १४६ फेºया रद्द होत ३ हजार ३१० किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे. तर ४ आॅगस्ट रोजी १४८ फेºया रद्द होत १ हजार ८७५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी ४ फेºया रद्द होत त्यांचे ३६० किलो मीटरचा प्रवास रद्द झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी आशिष चौधरी यांनी लोकमतला सांगितले.
वसई आगारातील १२७ फेºया रद्द झाल्या असून ५ हजार ५३७ किलो मीटरचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. ४ आॅगस्ट रोजी ३३१ फेºया रद्द होत १६ हजार ९६८ कि.मी. प्रवास रद्द करण्यात आला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ७२ फेरीद्वारे ५ हजार २२५ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे.
३ आॅगस्ट रोजी अर्नाळा विभागातील ४६ फेºया रद्द झाल्या असून ४ हजार ७३९ कि.मी. प्रवास रद्द झाला. ४ आॅगस्ट रोजी २९२ फेºया रद्द होत १९ हजार १२४ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ४० फेºया रद्द होत ५ हजार १५७ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला आहे.
डहाणू आगार अंतर्गत १०८ फेºया रद्द झाल्या असून २ हजार ७८२ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे. ४ आॅगस्ट रोजी १७४ फेºया रद्द झाल्या असून ६ हजार ०३० कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी ५८ फेºया रद्द होत २ हजार ९१७ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.
जव्हार आगार अंतर्गत ३ आॅगस्ट रोजी १३२ फेºया रद्द होत ६ हजार १६१ कि.मी. रद्द झाले असून ४ आॅगस्ट रोजी १३५ फेºया रद्द होत १३ हजार ०३४ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी १०५ फेºया रद्द होत ५ हजार २६६ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.
बोईसर आगार अंतर्गत ३ आॅगस्ट रोजी १३२ फेºया रद्द होत ३ हजार ३९१ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला असून ४ आॅगस्ट रोजी ३०५ फेºया रद्द होत ८ हजार २३६ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी १२९ फेºया रद्द झाल्या असून ३ हजार ९५६ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.
नालासोपारा विभागांतर्गत ३ आॅगस्ट रोजी १०० फेºया रद्द झाल्या. ४ आॅगस्ट रोजी १४६ फेºया रद्द होत १३ हजार ८८७ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ६६ फेºया रद्द होत ९ हजार ३४३ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे.
दररोज ३ हजार ३७४ फेºया
पालघर आगारातून ६९२ दैनंदिन फेºया होतात. सफाळे आगारातून ४२७ दैनंदिन फेरीद्वारे ७ हजार ६७६ किलो मीटरचा पल्ला गाठला जातो. वसई आगारातून ३५८ फेºयाद्वारे २० हजार १४५ किलो मीटरचा पल्ला गाठला जातो. अर्नाळा विभागातून २९८ फेरीद्वारे २२ हजार ६५५ कि.मी.चा पल्ला गाठला जातो. डहाणू आगारातून ४४५ फेºयाद्वारे १६ हजार ४० किलोमीटर, जव्हार आगारातील ४५७ फेºयाद्वारे १९ हजार ६३६ किलोमीटर, बोईसर आगारातून ५५५ फेºयाद्वारे २२ हजार ३८ कि.मी. तर नालासोपारा आगारातील १४६ फेºयाद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा पल्ला असा एकूण पूर्ण पालघर विभागांतर्गत ३ हजार ३७४ दैनंदिन फेºयाद्वारे १ लाख ४३ हजार ३६ कि.मी.चा पल्ला दररोज एसटीद्वारे गाठला
जात आहे.
आमच्या हक्काच्या उत्पन्नापासून आम्हाला मुकावे लागले असून आता येणाºया सणाच्या निमित्ताने जादा फेºया वाढवून हे नुकसान भरून काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. - अजित गायकवाड, विभाग नियंत्रक, पालघर विभाग