पालघरमधील शेतकऱ्यांचे ९२ कोटींचे कर्ज माफ
By admin | Published: June 25, 2017 03:52 AM2017-06-25T03:52:51+5:302017-06-25T03:52:51+5:30
दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या पालघरच्या १५ हजार ५८१ शेतकऱ्यांना ९२ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.
सुरेश लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या पालघरच्या १५ हजार ५८१ शेतकऱ्यांना ९२ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली
पालघर जिल्ह्यातील १५ हजार ५८१ शेतकऱ्यांकडे सुमारे १०३ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी होती. परंतु, जून महिन्यात काही शेतकऱ्यांनी कर्जफेड केल्याने शिल्लक राहिलेल्या ९२ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी झाली आहे. यापैकी १३ हजार ९६९ शेतकऱ्यांना ८० कोटी ५१ लाखांचे पीककर्ज माफ झाले आहे. याशिवाय एक हजार ८८२ शेतकऱ्यांना १२ कोटींचे मध्यम मुदतीची कर्जमाफी झाली. पाच हजार २५९ मोठ्या शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे. तर २४ कोटी ६१ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ सुमारे तीन हजार ७५४ लहान शेतकऱ्यांना झाला आहे. सहा हजार ६५३ मध्यम शेतकऱ्यांना सुमारे ४३ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी झाली .पालघर जिल्ह्यात भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पीकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. भात पीकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहेत. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.