रानडुक्कर समजून साथीदारांना घातल्या गोळ्या; पालघरमध्ये गावकऱ्यांनी जंगलात लपवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:41 IST2025-02-05T19:39:27+5:302025-02-05T19:41:40+5:30

पालघरमध्ये शिकारीसाठी गेलेल्या दोघांचा साथीदारांमुळे मृत्यू झाला.

Palghar hunter shot his companion mistaking him for wild boar 6 people taken into custody after his death | रानडुक्कर समजून साथीदारांना घातल्या गोळ्या; पालघरमध्ये गावकऱ्यांनी जंगलात लपवला मृतदेह

रानडुक्कर समजून साथीदारांना घातल्या गोळ्या; पालघरमध्ये गावकऱ्यांनी जंगलात लपवला मृतदेह

Palghar Crime: पालघर जिल्ह्यात शिकारीदरम्यान, एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. शिकारीला गेलेल्या दोघांचा साथीदारांमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. जंगलात शिकारीसाठी गेलेल्या गावकऱ्यांनी चुकून रानडुकर समजून त्यांच्याच दोन साथीदारांवर गोळी झाडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर हा सगळा उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या गावकऱ्याचा मृत्यदेह साथीदारांनी जंगलात लपवून ठेवला होता.

पालघर जिल्ह्यात शिकार करताना दोन गावकऱ्यांना रानडुक्कर समजून त्यांच्या साथीदारांनी गोळ्या घातल्या. या गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला.  बंदुकीच्या गोळीमुळे एकाचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीच्या रात्री झालेल्या या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धारशिवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकरी रानडुकरांची शिकार करण्यासाठी मनोर येथील बोरशेटी जंगलात गेले होते. 'शिकाराचा प्रयत्न करत असताना काही गावकरी त्यांच्या साथीदारांपासून वेगळे झाले. काही वेळाने, गावकऱ्यांपैकी एकाने रानडुक्कर आहे समजून त्यांच्याच साथीदारांवर गोळी झाडली. त्यात दोन गावकरी जखमी झाले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला, असे  धारशिवकर यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून सहा गावकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी जंगलात बराच शोध घेतल्यानंतर गावकऱ्याचा मृतदेह बाहेर काढला.  मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवला, असे धारशिवकर यांनी सांगितले. जखमी गावकऱ्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि कोणाला काही न सांगता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Palghar hunter shot his companion mistaking him for wild boar 6 people taken into custody after his death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.