पालघर हत्याकांड : अठरा आरोपींची जामिनावर सुटका, ठाणे विशेष न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 01:44 AM2020-11-04T01:44:25+5:302020-11-04T01:44:47+5:30
Palghar lynching case: डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका जमावाने गुजरातकडे जाणाऱ्या तीन साधूंची चोर समजून हत्या केली होती. याच प्रकरणामध्ये लक्ष्मण जाधव याच्यासह अनेकांना अटक झाली आहे.
ठाणे : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथील तीन साधूंच्या हत्याकांड प्रकरणातील लक्ष्मण रामजी जाधव (५८) याच्यासह १८ जणांची मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका जमावाने गुजरातकडे जाणाऱ्या तीन साधूंची चोर समजून हत्या केली होती. याच प्रकरणामध्ये लक्ष्मण जाधव याच्यासह अनेकांना अटक झाली आहे. यामध्ये नितीन लक्ष्मण जाधव (२६), मनोज लक्ष्मण जाधव (२५) या मुलांसह त्यांचे वडील लक्ष्मण जाधव (५८) तसेच तुकाराम साथ (४०, रा. गडचिंचले, पालघर) या चौघांविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता.