पालघर हत्याकांड: पिता पुत्रासह १८ जणांची जामीनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:45 PM2020-11-03T23:45:50+5:302020-11-03T23:48:44+5:30

पालघर जिल्हयातील गडचिंचले येथील तीन साधूंच्या हत्याकांड प्रकरणातील लक्ष्मण रामजी जाधव (५८) यांच्यासह १८ जणांची मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली. या आरोपींविरुद्ध थेट पुरावेही नसल्याचे आरोपीच्या वकीलांचे म्हणणे होते.

Palghar massacre: 18 released on bail | पालघर हत्याकांड: पिता पुत्रासह १८ जणांची जामीनावर सुटका

ठाणे विशेष न्यायालयाचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे ठाणे विशेष न्यायालयाचे आदेश थेट पुरावेही नसल्याचा आरोपीच्या वकीलांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पालघर जिल्हयातील गडचिंचले येथील तीन साधूंच्या हत्याकांड प्रकरणातील लक्ष्मण रामजी जाधव (५८) यांच्यासह १८ जणांची मंगळवारी ठाणे विशेष न्यायालयाने जामीनावर सुटका केली. सरकारी नोकरावर हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका जमावाने गुजरातकडे जाणाऱ्या तीन साधूंची चोर समजून हत्या केली होती. याच प्रकरणामध्ये लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेकांना अटक झाली आहे. यामध्ये नितीन लक्ष्मण जाधव (२६), मनोज लक्ष्मण जाधव (२५) या मुलांसह त्यांचे वडिल लक्ष्मण रामजी जाधव (२६) तसेच तुकाराम रुपजी साथ (४०, रा. गडचिंचले, पालघर) या चौघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी नोकरावर (पोलिसांवर) हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल माजविणे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा आदी कलमांखाली कासा पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी यातील दोन वेगवेळया प्रकरणांवर ठाणे विशेष न्यायालयात सुनावणी झाली. अन्य एका प्रकरणात १४ आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे. आरोपींपैकी जाधव यांच्यासह चार तसेच अन्य १४ अशा १८ आरोपींची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आरोपींविरुद्ध थेट पुरावेही नसल्याचे आरोपीच्या वकीलांचे म्हणणे होते. विशेष सरकारी वकील म्हणून सतीश माने शिंदे यांनी यावेळी पोलिसांची बाजू मांडली.

Web Title: Palghar massacre: 18 released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.