पालघर पोलिसांची कामगिरी : मुसक्या आवळताच भावाचा झाला ‘पोपट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:28 AM2018-01-22T02:28:19+5:302018-01-22T02:28:30+5:30

प्रेमप्रकरणातून पाम टेम्भी येथून आपल्या मजनूला त्याच्या आसाममधील मूळ गावी पळून गेलेल्या लैलासह पालघर पोलिसांनी गोहाटी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय अमूल्य बर्मन याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.

 Palghar police's performance: Mum had just been a brother in 'Popat' | पालघर पोलिसांची कामगिरी : मुसक्या आवळताच भावाचा झाला ‘पोपट’

पालघर पोलिसांची कामगिरी : मुसक्या आवळताच भावाचा झाला ‘पोपट’

Next

हितेंन नाईक 
पालघर : प्रेमप्रकरणातून पाम टेम्भी येथून आपल्या मजनूला त्याच्या आसाममधील मूळ गावी पळून गेलेल्या लैलासह पालघर पोलिसांनी गोहाटी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय अमूल्य बर्मन याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.
सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पामटेम्भी येथे फिर्यादीचे किराणाचे दुकान असून त्याला दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी पालघरच्या एका महाविद्यालयात १२ वी सायन्समध्ये शिकत असून तिचे आपल्या घरात भाडेकरू म्हणून राहणाºया आरोपी संजय बर्मन यांच्या सोबत प्रेमसंबंध होते. याची कल्पना तीच्या घरच्यांना आल्या त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध दर्शविला होता. १५ जानेवारी रोजी आपण कॉलेजला जातो असे सांगून ती घरातून गेली परंतु ती संध्याकाळपर्यंत घरी आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच आढळून न आल्याने पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी चौकशी केली असता आरोपीने तिचे अपहरण करून तिला आसाममधील गोहाटी (नोनामती) येथे नेल्याची माहिती मिळाली. कुर्ला टर्मिनस येथून सुटणाºया गोहाटी एक्स्प्रेसने ते गेल्याचे कळल्या नंतर उपनिरीक्षक सय्यद तौफिक आणि पोलीस मोहन पवार यांनी विमान पकडून सरळ गोहाटी गाठले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीला तिच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी केली तत्परतेने कारवाई-
नोनामतीला पोहचण्यात पोलिसांना थोडा उशीर झाला त्यामुळे हे प्रेमी निसटले. सय्यद यांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या भावाचे हार्डवेअरचे दुकान असल्याची माहिती काढून साहित्याची आॅर्डर द्यायच्या नावाखाली बोलावून ताब्यात घेतले. अधिक चौकशी अंती त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच नोनामती या आपल्या गावातील घरात दोघे असल्याचे त्यांनी सांगितल्यावर आरोपी बर्मन व त्या मुलीला तेथून ताब्यात घेतले व पालघरला आणले.

Web Title:  Palghar police's performance: Mum had just been a brother in 'Popat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.