ठाणेसह पालघरच्या अर्धवेळ शिक्षकांचे बंद केलेल्या दिवसापासून वेतन सुरू ; न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने दिवाळी गोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 05:45 PM2018-11-01T17:45:50+5:302018-11-01T17:50:43+5:30

शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते. या सर्व शिक्षकांना एकत्र करून शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज .मो. अभ्यंकर, यांच्या आदेशान्वये मुंबई उच्च न्यायालयात मी दाद मागितली. त्यास अनुसरून शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरत ज्या दिवसापसून वेतन बंद केले, त्यादिवसापासून तत्काळ वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिला

Palghar's part-time teachers get salary from day off; Diwali sweet by the interim order of the court! | ठाणेसह पालघरच्या अर्धवेळ शिक्षकांचे बंद केलेल्या दिवसापासून वेतन सुरू ; न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने दिवाळी गोड !

दिवाळी आधीच या अर्धवेळ शिक्षकांची दिवाळी गोड होऊन त्यांच्या आनंदोत्सव

Next
ठळक मुद्दे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते.मुंबई हायकोर्टाचे वकील शेख यांचे शुल्क ४५ हजार रूपये देण्याची देखील ऐपत  नव्हती. ती शुल्क मी स्वत: भरून५० अर्धवेळ शिक्षकांना ऐन दिवाळीत न्याय मिळवून दिल्याचे समाधान

ठाणे : शासनाच्या तांत्रिक त्रृटीमुळे संचमान्यतेत अर्धवेळ शिक्षकाचे पद दिसत नव्हते. यामुळे शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५० अर्धवेळ शिक्षकांचे पगार बंद केले होते. या सर्व शिक्षकांना एकत्र करून शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज .मो. अभ्यंकर, यांच्या आदेशान्वये मुंबई उच्च न्यायालयात मी दाद मागितली. त्यास अनुसरून शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरत ज्या दिवसापसून वेतन बंद केले, त्यादिवसापासून तत्काळ वेतन सुरू करा, असा अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिला, असे शिक्षक सेना कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. यामुळे दिवाळी आधीच या अर्धवेळ शिक्षकांची दिवाळी गोड होऊन त्यांच्या आनंदोत्सव व्यक्त केला जात आहे.
कार्यरत असलेल्या या अर्धवेळ शिक्षकांना वेतन मिळावे यांनी प्रारंभी शिक्षण शिक्षणाधिकारी , उपसंचालक , शिक्षण संचालक , शिक्षण सचिव आदी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिंजवले. पण या शिक्षकांवरील कोणीही अन्याय दूर केला नाही. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी इडली विकून तर काहींनी पेपर विकून उदरनिर्वाह केला. त्यांच्या वरील हा अन्याय दूर करण्यासाठी न्यायालयीन दरवाजे थोटावण्याचा प्रसंग उद्भवला. मात्र त्यांच्याकडे मुंबई हायकोर्टाचे वकील शेख यांचे शुल्क ४५ हजार रूपये देण्याची देखील ऐपत  नव्हती. ती शुल्क मी स्वत: भरून या ५० अर्धवेळ शिक्षकांना ऐन दिवाळीत न्याय मिळवून दिल्याचे समाधान म्हात्रे यांनी व्यक्त केले.
शिक्षण विभागाच्या निष्काळी व दुर्लक्षितपणामुळे अचानक पगार बंद झाल्याने या शिक्षकांवर आर्थिक संकट ओढावले होते. सर्वांवर आले होते. म्हात्रे, यांनी आमच्या नोटीसचे पैसे ४५ हजार रूपये कोर्टामध्ये भरून रिट पिटीशन दाखल केली. त्यास प्राप्त झालेल्या यशामुळे आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दोन वर्षांनंतर आता कुठे तरी आम्ही सर्वजन दिवाळी साजरी करणार असल्याचे अर्धवेळ शिक्षकाच्या बाजूने विलास आंब्रे यांनी स्पष्ट केले. यासाठी या आर्थिक संकट प्रसंगी अभ्यंकर यांच्यासह आमदार बालाजी किणीकर, दलीप राजे आदींसह ठाणे पालघरमधील सुमारे २१ शिक्षकांचे देखील आम्ही आभारी असल्याचे आंबे्र यांनी सांगितले.
------------

Web Title: Palghar's part-time teachers get salary from day off; Diwali sweet by the interim order of the court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.