पालिका, व्यापारी आले आमनेसामने; अतिक्रमण हटाव, कारवाईला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 12:32 AM2020-11-08T00:32:59+5:302020-11-08T00:45:30+5:30

उल्हासनगर : शहरातील पदपथांवरील अतिक्रमण कारवाईवेळी व्यापारी व मनपा कर्मचारी शुक्रवारी आमनेसामने आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांवर अदखलपात्र ...

Palika, traders came face to face; Eliminate encroachment, oppose action | पालिका, व्यापारी आले आमनेसामने; अतिक्रमण हटाव, कारवाईला विरोध

पालिका, व्यापारी आले आमनेसामने; अतिक्रमण हटाव, कारवाईला विरोध

Next

उल्हासनगर : शहरातील पदपथांवरील अतिक्रमण कारवाईवेळी व्यापारी व मनपा कर्मचारी शुक्रवारी आमनेसामने आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून मुजोर व्यापाऱ्यांनी ट्रकमध्ये टाकलेले साहित्य काढून घेतले.
मोबाइल, फर्निचर, जपानी व गजानन कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये नागरिकांनी दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला. नेहरू चौक, शिरू चौक, शिवाजी चौक परिसरातील रस्ते, पदपथांवरील फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.

दरम्यान, मनसेचे सचिन बेंडके यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने फेरीवाल्यांची व्यथा उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे मांडून साहित्य विक्री करण्यास परवानगी मागितली. नंतर अतिक्रमण पथकाने मोर्चा शेजारील १७ सेक्शन येथील मोबाइल मार्केटकडे वळविला. फेरीवल्यांचे साहित्य जप्त केले व ट्रकमध्ये टाकले. 

या प्रकाराने व्यापारी व शिंपी, कर्मचारी आमनेसामने आल्याने  तणाव निर्माण झाला. मुजोर व्यापाऱ्यांनी महापालिका अतिक्रमण पथकाने जप्त करून ट्रकमध्ये टाकलेले सामान काढून टाकले. यामुळे शिंपी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. ऐन दिवाळीत  वाद नको म्हणून अनेक नेत्यांनी मध्यस्थी केली. अखेर, तक्रारीनंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले.

शिस्तीची गरज

ऐन दिवाळीत वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून अतिक्रमणविरोधी विभागाने पदपथावरील अतिक्रमण हटविले. व्यापाऱ्यांनी कारवाईला सहकार्य करायला हवे. अशी अपेक्षा असताना कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी केला आहे. 

Web Title: Palika, traders came face to face; Eliminate encroachment, oppose action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.