पंडित भवानी शंकर यांना संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 10:06 PM2017-11-04T22:06:15+5:302017-11-04T22:06:56+5:30
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे अंतिम सत्र सायंकाळी गुंफले
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे अंतिम सत्र सायंकाळी गुंफले. यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पं भवानी शंकर यांना संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार तर अपूर्वा गोखले याना संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी नगरसेविका प्रतिभा मढ़वी, मृणाल पेंडसे व उपायुक्त संदीप माळवी उपस्थित होते. 31 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या या महोत्सवत रसिकाना सांगीतिक मेजवानी मिळाली. आज शेवटच्या पुष्पाच्या सुरुवातीला पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तिनी सत्काराला उत्तर देताना पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. पं. भवानी शंकर यानी आपल्या मुख़ातून पखवाजचे बोल ऐकवले, त्यांनी त्यांच्या वडिलांची रचना असलेले शंकर तांडव सादर केले. आपले मनोगत व्यक्त करताना महापौर शिंदे म्हणाल्या की, ठाणे शहराची स्मार्ट सिटीकड़े वाटचाल आहे, ठाणे महापालिकेच्या कारदात्याना आपणही काही दिले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी देण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून होत असतो. पुरस्कार सोहळ्यानंतर अंतिम पुष्पाचे अंतिम सत्र ज्येष्ठ गायिका आरती अंकलिकर टिकेकर गुंफ़नार आहेत.