स्ट्रक्चरल ऑडिटसाठी अभियंत्यांचे पॅनल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:29+5:302021-06-24T04:27:29+5:30
उल्हासनगर : शहरातील इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महापालिकेने १५ जणांचे अभियंत्यांचे पॅनल नियुक्त केले. या अभियंत्या व्यतिरीक्त अधिकृत सरंचनात्मक अभियंत्याकडूनही ...
उल्हासनगर : शहरातील इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी महापालिकेने १५ जणांचे अभियंत्यांचे पॅनल नियुक्त केले. या अभियंत्या व्यतिरीक्त अधिकृत सरंचनात्मक अभियंत्याकडूनही इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट नागरिक करु शकतात अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीच्या दुर्घटनेनंतर १० वर्ष जुन्या १५०० इमारतींना नोटिसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. तसेच १९९४ ते ९८ च्या दरम्यान बांधलेल्या इमारतींचे सर्वेक्षण प्रभाग समिती निहाय करुन ५०५ इमारतींना ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. नागरिकांना इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट विनाअडथळा करता यावे म्हणून १५ सरंचनात्मक अभियंत्यांची नियुक्ती केली.
महापालिकेने १५०० पेक्षा जास्त इमारतींना नोटिसा बजाविल्या आहेत. कोरोना काळात नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शहर हितासाठी ऑडिटचा खर्च पालिकेने करावा अशी मागणी उपमहापौर भगवान भालेराव यांच्यासह भाजप, मनसेने केली आहे.