टिकमाणींनी दिली सेनेला सोडचिठ्ठी
By admin | Published: February 1, 2017 03:29 AM2017-02-01T03:29:34+5:302017-02-01T03:32:38+5:30
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर टीका करून कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, आता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी
ठाणे : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर टीका करून कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, आता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे शिवसनेत प्रवेश केलेल्यांवर भाजपाने लक्ष केले असून काही नगरसेवक आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
युती तुटली आणि आता शिवसेना आणि भाजपा हे स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे आता उमेदवारांची पळवापळवी जोरात सुरु झाली आहे. त्यानुसार शिवसेनेने आतापर्यंत १७ तर भाजपानेदेखील तेवढेच नगरसेवक आपल्या खात्यात जमा केले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा आता शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी व्युव्हरचना आखत आहेत. त्यांच्याच या व्युहरचनेचा भाग म्हणून त्यांच्या गळाला कोपरीतील लक्ष्मण टिकमाणी सारखा मोठा मासा गाळला लागला आहे. विशेष म्हणजे टिकमाणी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळेस भरत चव्हाण यांनीदेखील भाजपात प्रवेश केला होता. परंतु, हे दोघे आमने सामने येत असल्याने भाजपाने खेळी केली आणि चव्हाण यांच्या सोबतीला आता टिकमाणी यांनादेखील पक्षात प्रवेश देऊन त्यांनी येथील वॉर्ड मजबुत केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हा आता शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. टिकमाणी यांना तिकीट देण्याच्या नादात सेनेने निष्ठावान शिवसैनिकाचा बळी देण्याचे ठरविले होते. आता टिकमाणी गेल्याने निष्ठावंताला न्याय मिळू शकतो.