पनवेल, डोंबिवली, उल्हासगर, नवी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, वातावरणात गारवा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:53 AM2017-11-20T09:53:26+5:302017-11-20T11:04:15+5:30

पनवेलसह खारघर, कळंबोली ,कामोठे नवी मुंबईत पावसाच्या सरींनी रस्ते ओलेचिंब झाले. त्यामुळे गारवा आणखीनच वाढला. 

Panvel, Dombivli, Ulhasagara, Navi Mumbai, have been lamenting the downpour | पनवेल, डोंबिवली, उल्हासगर, नवी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, वातावरणात गारवा वाढला

पनवेल, डोंबिवली, उल्हासगर, नवी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, वातावरणात गारवा वाढला

Next

पनवेल - नोव्हेंबर म्हणजे थंडीचा महीना एकीकडे थंडीचा कडाका वाढू लागला असतानाच सोमवारी सकाळी पनवेलसह खारघर, कळंबोली ,कामोठे नवी मुंबईत पावसाच्या सरींनी रस्ते ओलेचिंब झाले. त्यामुळे गारवा आणखीनच वाढला. 

परिसरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. सकाळी अचानकपणे पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. उन्हाच्या तडाख्यामुळे  हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत.

उल्हासनगर शहरात ढगाळ व पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. डोंबिवलीतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, भुसावळ, जामनेरसह अनेक भागात सोमवारी सकाळी अवकाळी पाऊस झाला.

भिवंडी शहरात अचानकपणे आकाशात ढग जमून पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रिमझीम पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.सकाळच्या सत्रात शाळेत गेलेले विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहे तर पॉवरलूममध्ये विविध काम करणारे कामगारांनी भिजत काम करणे पसंत केले.अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने मात्र रिक्षाचालकांना लॉटरी लागली. छत्री नसल्याने अनेकांनी न भिजता रिक्षातून प्रवास करणे पसंत केले.

Web Title: Panvel, Dombivli, Ulhasagara, Navi Mumbai, have been lamenting the downpour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस