पप्पू कलानी यांच्या पीएची, पहिल्या पत्नीसह आत्महत्या; घरगुती वादातून दोघांनी जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:34 PM2023-08-02T14:34:55+5:302023-08-02T14:35:19+5:30

मध्यवर्ती रुग्णालयात ननावरे पती-पत्नीचे शवविच्छेदन झाल्यावर, मृतदेह फलटण (सातारा) येथे नेण्यात आले आहेत. 

Pappu Kalani's PA, suicide with first wife; Preliminary information that both ended their lives due to a domestic dispute | पप्पू कलानी यांच्या पीएची, पहिल्या पत्नीसह आत्महत्या; घरगुती वादातून दोघांनी जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती

पप्पू कलानी यांच्या पीएची, पहिल्या पत्नीसह आत्महत्या; घरगुती वादातून दोघांनी जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती

googlenewsNext

उल्हासनगर : माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे खासगी स्वीय सहायक नंदू ननावरे यांनी घरगुती वादातून पहिल्या पत्नीसह घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मध्यवर्ती रुग्णालयात ननावरे पती-पत्नीचे शवविच्छेदन झाल्यावर, मृतदेह फलटण (सातारा) येथे नेण्यात आले आहेत. 

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४, आशेळेगाव नागराणी मंदिरामागे नंदू ननावरे हे दोन पत्नी व दोन मुलामुलींसह तीन मजल्यांच्या घरात राहत होता. ननावरे यांनी माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले असून, ते कलानी कुटुंबाच्या शासकीय कार्यालयातील कामांचा पाठपुरावा करायचे. मंत्रालयातील कामानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे त्यांचे जाणे-येणे होते, असे बोलले जाते. मंगळवारी दुपारी अडीच वाजता पहिली पत्नी उज्ज्वलासह नंदू ननावरे हे घरात होते, तर दुसरी पत्नी ही मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती, तर पहिल्या पत्नीची मोठी मुलगी कॉलेजला गेली होती.

नंदू ननावरे व पहिली पत्नी उज्ज्वला घरी एकटी असताना दुपारी उज्ज्वला यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यावेळी मोठा आवाज झाल्याने, शेजारील नागरिक घराबाहेर आले. त्यावेळी नागरिकांना उज्ज्वला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. नंदू ननावरे हे सुद्धा तिसऱ्या मजल्यावर उडी मारण्याच्या तयारीत होते. त्यावेळी नागरिकांनी त्यांना उडी मारू नका, अशी विनवणी केली. मात्र त्यांनीही उडी मारून आत्महत्या केली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले. याप्रकरणी सखोल तपास करणार असल्याचे संकेत पोलिस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिले.

माझा खासगी स्वीय सहायक नाही : आ. किणीकर
नंदू ननावरे यांचे माझ्या आमदार कार्यालयात येणे-जाणे होते. मात्र, ते माझे अधिकृतपणे खासगी स्वीय सहायक नसल्याचे आमदार बालाजी किणीकर यांनी सांगितले.
 

Web Title: Pappu Kalani's PA, suicide with first wife; Preliminary information that both ended their lives due to a domestic dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.