बाप-लेकीची आत्महत्या

By admin | Published: July 2, 2017 04:12 AM2017-07-02T04:12:39+5:302017-07-02T04:12:39+5:30

घटस्फोटामुळे नैराश्य आलेल्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का बसलेल्या वडिलांनी, विरार रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी मारून

Parent-suicide | बाप-लेकीची आत्महत्या

बाप-लेकीची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : घटस्फोटामुळे नैराश्य आलेल्या मुलीने आत्महत्या केल्याचा धक्का बसलेल्या वडिलांनी, विरार रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. शनिवारी दुपारी दोघांच्या मृतदेहांवर नालासोपारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोयुकृष्णा नायडू (६०) आणि मंजुळा नायडू (२६) अशी त्यांची नावे आहेत. चार वर्षांपूर्वी मंजुळाचे लग्न झाले होते, पण तिचा पती आणि सासरच्या लोकांशी वाद होता. चार महिन्यांत तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर, ती विरारला वडिलांसोबत राहत होती. तिने दुसरे लग्न करावे, असा वडिलांचा आग्रह होता, पण मंजुळा तयार नव्हती. गुरुवारी रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. त्यानंतर, मंजुळा बेडरूममध्ये आतून कडी लावून झोपून गेली. तिने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच, धक्का सहन न झालेल्या वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली.

Web Title: Parent-suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.