वाढीव फी रद्द करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत पालकांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:31+5:302021-07-16T04:27:31+5:30
मुंब्रा : वाढीव फी कमी करण्याबाबतचे तसेच क्रमिक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशक बदलण्याबाबत शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी दिलेल्या आश्वासनांची ...
मुंब्रा : वाढीव फी कमी करण्याबाबतचे तसेच क्रमिक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशक बदलण्याबाबत शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी, या मागणीसाठी दिव्यातील एसएमजी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत समाजसेवक अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या परिसरात ठिय्या आंदोलन केले. शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकाने चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री अकरा वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सकाळी पालकांच्या वतीने अश्विनी केंद्रे, सायली शेंगाळे, रिद्धी गुंजाळ, अर्चना महाडिक, ज्योत्स्ना कदम यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पालकांची कैफियत मांडल्यानंतर गायकवाड यांनी शिष्टमंडळासमोरच शाळेवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती केंद्रे यांनी लोकमतला दिली.