बेकायदा फीविरोधात पालकांचा मोर्चा; अंबरनाथमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:06 PM2019-06-19T23:06:33+5:302019-06-19T23:07:03+5:30
अधिकाऱ्यांची ठोकळेबाज उत्तरे
अंबरनाथ : अंबरनाथमधील तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान असतानाही त्या शाळा बेकायदा फी आकारत आहेत. या फीविरोधात तीन शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी बुधवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चेकºयांसोबत चर्चा करताना अधिकाºयांची उत्तरेही पालकांना निराश करणारी होती. बेकायदा फी आकारणाºयांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचा अहवाल पाठवू, असे मोघम उत्तर देत आपली जबाबदारी झटकण्याचे काम अधिकारी करत होते.
अंबरनाथ शहरातील तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान असतानाही या शाळा पालकांकडून फी आकारत आहेत. यासंदर्भात गटशिक्षणाधिकाºयांनी १० जून रोजी आदेश काढून अनुदानित शाळेने फी आकारू नये, असे निर्देश दिले. मात्र, असे असतानाही शाळांनी फीआकारणी बंद केली नाही. या तिन्ही शाळा पालकांना फी भरण्याची सक्ती करत आहेत. फी न भरणाºया पालकांच्या पाल्यांना पुस्तके दिली जात नाही. त्यामुळे पालकांची चांगलीच कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी तिन्ही शाळांतील पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. दोनशेहून अधिक पालक या मोर्चात सहभागी झाले होते.
पालकांच्या शिष्टमंडळाने अधिकाºयांशी चर्चा करताना आपल्या समस्या मांडल्या. मात्र, या समस्यांवर तोडगा न काढता केवळ सावध भूमिका घेण्याचे काम अधिकाºयांनी केले. बेकायदा फी घेणाºया शाळांवर कारवाईची मागणी पालक करत असताना त्या शाळांवर आम्ही कारवाई करू शकत नाही, असे उत्तर अधिकारी देत होते. तसेच यासंदर्भातील अहवाल तयार करून तो अहवाल पाठवू, इतकेच उत्तर अधिकारी देत होते. अखेर, काही पालकांनी ठोस भूमिका घेतल्यावर यासंदर्भात कारवाईचे संकेत अधिकाºयांनी दिले. त्यांच्या उत्तरानंतर मोर्चाची सांगता झाली.