विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवले ते पालकांना घरबसल्या कळणार

By जितेंद्र कालेकर | Published: September 2, 2022 08:32 PM2022-09-02T20:32:38+5:302022-09-02T20:32:56+5:30

ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी ॲप : शिक्षणाकरिता होणार लाभ

Parents will know what students were taught in school at home | विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवले ते पालकांना घरबसल्या कळणार

विद्यार्थ्यांना शाळेत काय शिकवले ते पालकांना घरबसल्या कळणार

googlenewsNext

ठाणे: तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेणार नाही. परंतु शिक्षकाच्या हातातील तंत्रज्ञान परिवर्तन घडवू शकते या उद्देशाने 'सेंट जॉन लर्निंग ॲप'चे उद्घाटन गुरुवारी ठाण्यातील सेंट जॉन द बाप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शाळेच्या सभागृहात शाळेचे व्यवस्थापक फादर जेरोम लोबो, मुख्याध्यापक फादर थॉमसन किणी यांच्या हस्ते पार पडले.

या ॲपमुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवले याची माहिती पालकांना मिळणार आहे. उपमुख्याध्यापक एडवर्ड मास्कारेन्हास, संस्थापक दीपक डायस, फादर ग्लॅस्टन, सिंघानिया एज्युकेशनचे सीईओ डॉ. ब्रिजेश कारिया आणि विविध विभागाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पालक आणि शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

Web Title: Parents will know what students were taught in school at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे